आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रॅव्हल्सच्या अमर्याद भाडेवाढीला लगाम; एसटीपेक्षा दीडपटच भाडे घेण्याची मुभा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - सणासुदी, सुट्यांच्या काळात  राज्यातील खासगी प्रवासी वाहने तिकीट दर वाढवून प्रवाशांची सर्रास लूट करतात. हे प्रकार थांबवण्यासाठी शासनाने खासगी वाहनांचे भाडे दर निश्चित केले अाहेत. त्यानुसार या खासगी वाहनांना आता गर्दीच्या काळात एसटी महामंडळाच्या बस भाडे दराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येईल, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.  


यासंदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी जारी झाला. कमाल भाडे दरापेक्षा अधिक भाडे आकारल्यास मोटार वाहन कायद्याप्रमाणे वाहनाचा परवाना रद्द होईल, असे रावते यांनी सांगितले. गर्दीच्या हंगामात खासगी वाहतूकदार ग्राहकांकडून दुप्पट, चाैपट भाडे वसूल करत असतात. या पार्श्वभूमीवर दाखल एका याचिकेत या वाहतुकीचे  भाडे दर निश्चित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले हाेते. 

 

प्रवाशांना दिलासा
रावते म्हणाले, शनिवारपासून सलग ४ दिवस सुटी असल्याने खासगी वाहनांनी प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात दर आकारणी केल्याच्या तक्रारी आहेत. ज्या मार्गासाठी ५०० रुपये भाडे असते, तेथे २ हजारांपर्यंत भाडे घेतले जात अाहे. ही मनमानी तसेच प्रवाशांची अडवणूक रोखण्याच्या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतला अाहे.

बातम्या आणखी आहेत...