आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानगरपालिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्ती वय 60 वर्षे;एकनाथ शिंदेंची मागणी मान्‍य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ आणि राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट अ मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणेच राज्यातील महापालिकांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वयही ५८ वरून ६० करण्याची सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी केलेली मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे. याबाबतचे आदेश तत्काळ निर्गमित करण्याचे निर्देश त्यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत.  


आरोग्य सेवा संचालनालयातील तसेच राज्य कामगार विमा योजनेतील गट अ मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ ऐवजी ६० करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्याबाबतचा शासन निर्णय देखील ३ सप्टेंबर २०१५ रोजी जारी करण्यात आला होता. मात्र, महापालिकांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होत नव्हता. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी ही बाब उपस्थित केली. महापालिकांतील अधिकाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होत नसल्यामुळे अनेक पालिकांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

बातम्या आणखी आहेत...