आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RSS व गडकरी आखताहेत मोदींच्या हत्येचा कट!, वाचा कोण म्हणाले अन् गडकरी काय म्हणाले?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (RSS) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट आखत आहेत. तसेच या हत्येचे खापर मुस्लिम किंवा कम्यूनिस्ट लोकांवर फोडायचे व नंतर दंगली घडवून मुस्लिमांच्या हत्या घडवून आणायच्या, असे टि्वट 'जेएनयू'तील विद्यार्थी नेत्या शेहला रशीद यांनी शनिवारी केला. दरम्यान, शेहला रशीद यांच्या टि्वटनंतर नितीन गडकरी यांनी टि्वट करत, असा खोडसाळपणा करणा-याविरूद्ध कायदेशीर कारवाई करू असा इशारा दिला. यानंतर आपण तर हे टि्वट चेष्टामस्करीने व उपरोधिक केल्याचे शेहला यांनी म्हटले आहे. 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजीव गांधी यांच्याप्रमाणे रोड शो दरम्यान हत्या घडवून आणण्याचे षडयंत्र नक्षली रचत असल्याचा दावा नुकतेच सरकारी वकिलांनी कोर्टात केला आहे. यावरून डाव्या चळवळीतील लोकांनी यामागे राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. डाव्या चळवळीतील लोकांकडून मोदींना कोणताही धोका नसल्याचे त्यांना वाटते. त्याच पार्श्वभूमीवर, 'जेएनयू'तील विद्यार्थी नेत्या शेहला रशीद यांनी उपरोधिक टि्वट करत मोदी यांच्या हत्येचा कट नितीन गडकरी व RSS आखत असल्याचे टि्वट केले. संघ व गडकरी मोदींची हत्या करतील व त्याचे खापर मुस्लिम व कम्यूनिस्टांवर फोडले जाईल व त्यानंतर देशात दंगली घडवून मुस्लिमांच्या घडवल्या जातील असे टि्वट शेहला यांनी केले.

 

दरम्यान, शेहला यांच्या टि्वटनंतर गडकरी संतापले तसेच त्यांनी शेहला यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. समाजातील काही घटक वाह्यात कमेंट करत असून, मी त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करणार आहे असे गडकरी यांनी टि्वट केले.

 

नितीन गडकरींच्या टि्वटनंतर शेहला यांनी पुन्हा एकदा टि्वट केले व जगातील सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्यांना उपरोधिक व चेष्टामस्करीचीही टि्वट समजत नसल्याचे म्हटले. जरा कल्पना करा जेव्हा उमर खालीद याच्यासारख्या निष्पाप विद्यार्थ्यांवर व त्याच्या वडिलांवर जेव्हा देशद्रोहीसारखे आरोप मिडियातून करण्यात आले तेव्हा ते कोणत्या मनस्थितीतून गेले असतील. गडकरी तुम्हाला कारवाई करायची असेल तर राहुल शिवशंकर यांच्यासारख्यांवर केली पाहिजे असा सल्लाही शेहला यांनी गडकरींना दिला. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, शेहला रशीद व गडकरी यांनी याबाबत केलेली टि्वट....

बातम्या आणखी आहेत...