आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- सुप्रीम कोर्टाने सहारा गुपची 'अॅम्बी व्हॅली'ची प्रॉपर्टी तुकड्या-तुकड्यात विकायला बुधवारी परवानगी दिली. मुंबई हायकोर्टाच्या ऑफिशियल लिक्विडेटरने कोर्टाला सांगितले की, संपूर्ण अॅम्बी व्हॅली टाऊनशिप विकण्यासाठी 142 न्यूज पेपरमध्ये दोन वेळा जाहिरात प्रकाशित करण्यात आली. मात्र, त्याचा काहीही फायदा झाला नाही. संपूर्ण टाऊनशिप खरेदी करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे ही टाऊनशिप तुकड्या-तुकड्यात विकण्याची परवानगी मिळावी. यानंतर कोर्टाने तशी परवानगी दिली. अखेर काय खास आहे या टाऊनशिपमध्ये?
- लोणावालापासून 23 KM दूर मुंबई-पुणे हायवे लगत स्थित अॅम्बी व्हॅली देशातील पहिली लग्झरी प्लॅन्ड हिल सिटी आहे. या व्हॅलीची किंमत 39,000 कोटी रूपये इतकी असल्याचे मानले जाते.
- डोंगराळ भागात बनविलेली अॅम्बी व्हॅली एकून 10,600 एकरात पसरलेली आहे. अॅम्बी व्हॅलीत अनेक फिल्मस्टार, खेळाडू आणि व्हीआयपी लोकांचे बंगले आहेत. येथे सहाराचा प्रायवेट रनवे सुद्धा आहे.
- सुंदर व्हॅली, लेक आणि लग्जरी बंगल्याशिवाय येथे सहारा ग्रुपने गोल्फ कोर्स, स्पॅनिश कॉटेज, इंटरनॅशनल स्कूल, प्ले ग्राउंड आणि फॉर्च्यून फाउंटेन आहेत.
- येथे वॉटर स्पोर्ट्सपासून डर्ट रेस बाईकिंगची फॅसिलिटी आहे. अॅम्बी व्हॅलीमध्ये वॉटर स्पोर्ट्सशिवाय अॅडवेंचर स्पोर्ट्सचे इवेंट्स होतात.
- याशिवाय स्काय डायविंग यासारख्या फॅसिलिटीत येथे दिल्या जातात. येथूनच देशातील पहिली सी-प्लेन सेवा सुरू झाली होती.
स्कूल, गोल्फ कोर्स, एयरपोर्ट, आणि हॉटेल वेगवेगळे विकण्याचा मानस-
- लिक्विडेटरचे म्हणणे आहे की, अॅम्बी व्हॅली स्थित इंटरनॅशनल स्कूल, गोल्फ कोर्स, एयरपोर्ट, कन्वेंशन सेंटर आणि हॉटेलला एकाचवेळी विकण्याऐवजी वेगवेगळे विकावे.
- महिंद्रा अॅंड पीरामल ग्रुपने व्हॅलीतील काही भाग विकत घेण्याची तयारी दाखविली आहे.
- मागील सुनावणी दरम्यान कोर्टाने मुंबई हायकोर्टाच्या ऑफिशियल लिक्विडेटरला म्हटले होते की, त्यांनी रिसीवरची मदत घ्यावी आणि या संपत्तीचा लिलाव करावा.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, अॅम्बी व्हॅलीचे काही निवडक फोटोज....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.