आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी माणसासाठी शिवराय पक्षापलिकडचे, अपशब्द काढणाऱ्यांना ह्द्दपार करा: संभाजीराजे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खासदार संभाजीराजे. - Divya Marathi
खासदार संभाजीराजे.

मुंबई/कोल्हापूर- छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल कुणी अपशब्द काढले, तर त्याला पहिल्यांदा महाराष्ट्रातून हद्दपार करा, जर त्यांनी हद्दपार केले नाही तर आम्ही करु, अशा शब्दांत खासदार युवराज संभाजीराजे यांनी छिंदम प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मराठी माणसासाठी छत्रपती शिवराय हा विषय पक्षाच्या पलीकडचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

 

छिंदम सारख्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, त्यानी आता जरी माफी मागितली असली तरी नुसत्या माफीने खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

 

 

काय आहे प्रकरण?
अहमदनगरचे निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमची कथित क्लिप समोर आली आहे. एका कामासंदर्भात बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांना छिंदमने फोन केला, यावेळी बोलताना उपमहापौरांनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप अशोक बिडवे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी कामगार युनियनकडे तक्रारही दाखल केली.

 

 

आतापर्यंत भाजपने काय केले?

शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमला भाजपने उपहामौरपदावरुन निलंबित केले आहे. त्याची भाजपमधूनही हकालपट्टी करण्यात आली आहे. संभाजीराजे हे राज्यसभेवर राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित खासदार आहेत. राज्यसभेत भाजपचे सहयोगी सदस्यत्व त्यांनी स्वीकारले आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती