आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीरपणा न दाखवल्यास सर्वांनाच एक दिवस पकोडे तळावे लागतील: संजय राऊत यांचे वक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- युवकांनी पकोडे विकून बेरोजगारीवर मात करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा याप्रकरणी केंद्र सरकारवर टीका करुन समाचार घेतला आहे. काश्मीरमध्ये रोज जवान हुतात्मा होत आहेत. अन् आपण येथे पकोड्याबाबत बोलत आहोत. ही बाब गंभीरपणे न घेतल्यास एक दिवस सगळ्यांनाच दिल्लीत पकोडे तळण्याची वेळ येईल, असा टोला त्यांनी लगावला.

 

 

काश्मीरमध्ये बुधवारी दहशतवाद्यांनी एका रूग्णालयावर हल्ला करून तेथून एका कुख्यात दहशतवाद्याची सुटका करून पलायन केले होते. हाच मुद्दा उचलत राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. तिथे रूग्णालयात गोळी चालवण्यात आली. अन् इकडे आपण पकोड्याबद्दल बोलत आहोत. हे आपण गंभीरतेने घेतले नाही तर, एक दिवस सर्वांना दिल्लीत बसून पकोडे तळण्याची वेळ येईल, असे वक्तव्य राऊत यांनी केले.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...