आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- यात्रीगण कृपया ध्यान दें... हा आवाज जवळपास आपण सगळ्यांनीच रेल्वे स्थानकावर ऐकला असेल. दोन दशकाहून अधिक कालावधी झाला असेल हा आवाज तुम्हाला रेल्वेशी निगडित बाबींची माहिती देत आहे. आज आम्ही तुम्हाला हा आवाज नेमका कुणाचा आहे याची माहिती देणार आहोत.
कुणाचा आहे हा आवाज?
- या आवाजा मागचा आवाज सरला चौधरी यांचा आहे. त्या आज रेल्वेत उद्घोषिका म्हणून नसल्या तरी त्यांचा आवाज रेल्वे स्थानकावर गेलेल्या प्रत्येक भारतीयांच्या कानावर पडला आहे. सरला यांनी रेल्वेत 1982 साली काम करण्यास सुरुवात केली.
कसे होत होते त्यावेळी काम
1986 मध्ये हे पद स्थायी स्वरुपाचे करण्यात आले होते. त्यावेळी सरला चौधरी यांना बरेच कष्ट घ्यावे लागले. त्या काळात संगणक नसल्याने त्यांना अनेक ठिकाणी जाऊन ही उद्घोषणा रेकॉर्ड करावी लागली होती. याशिवाय वेगवेगळ्या भाषांमध्येही त्यांना ही उद्घोषणा रेकॉर्ड करावी लागली. आता रेल्वेत बरेच बदल झाले आहेत. आता ही जबाबदारी मॅनेजमेंट सिस्टिमला देण्यात आली आहे.
आता त्या कुठे आहेत?
एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सरला चौधरी यांनी 17 वर्षांपुर्वी रेल्वेची नोकरी सोडली आणि ओएचई विभागात कार्यालय अधिक्षिका म्हणून त्या रुजु झाल्या. त्यांचा आवाज स्टॅण्डबाय म्हणून सेव्ह करण्यात आला आहे. आजही स्टेशनवर तुम्हाला हा आवाज ऐकू येऊ शकतो.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.