आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- भारतातील सर्वात माेठी बँक एसबीआयने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये नकारात्मक आकडेवारी सादर केली आहे. बँकेला आॅक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीमध्ये १,८८६.५७ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. अनुत्पादित कर्ज (एनपीए) आणि त्यासाठीच्या तरतुदीमध्ये करण्यात आलेल्या वाढीमुळे तोट्यात वाढ झाली आहे.
त्याचबरोबर बँकेला ट्रेझरी अॉपरेशनमध्येही नुकसान होणार आहे. वर्षभरापूर्वी समान तिमाहीमध्ये बँकेला २,१५२.१४ कोटी रुपयांचा नफा झाला होता. स्टँडअलोन आधारावर बँकेला २,४१६ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.
डिसेंबर तिमाहीमध्ये बँकेच्या एनपीएचा आकडा वाढून १.९९ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सप्टेंबर तिमाहीमध्ये हा १.८६ लाख कोटी आणि वर्षभरापूर्वी डिसेंबर तिमाहीमध्ये १.०८ लाख कोटी रुपये होता. एसबीआयचे प्रमुख रजनीश कुमार यांनी सांगितले की, डिसेंबर तिमाहीमध्ये सुमारे २५,००० कोटी रुपयांचे कर्ज एनपीएच्या श्रेणीमध्ये आले आहे. असे मागील आर्थिक वर्षात २३,३३० कोटी रुपयांचा एनपीए अंडर रिपोर्टिंग किंवा डायव्हरजेंसमुळे झाले आहे.
बँक ऑफ बडोदाच्या नफ्यात ५६% घट
बँक ऑफ बडोदाच्या तिसऱ्या तिमाहीतील नफ्यात ५६% घट झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ मध्ये बँकेला ११२ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. बँकेचे एकूण उत्पन्न वाढून १२,९७६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. वर्षभरापूर्वी समान तिमाहीमध्ये ते १२,१८१ कोटी रुपये होते.
बँकेचे नेट इंटरेस्ट इन्कम ४०.२०% वाढून ४,३९४ कोटी रुपये राहिले. वर्षभरापूर्वी समान तिमाहीमध्ये ते ३,१३४ कोटी रुपये होते. बँकेच्या निव्वळ एनपीएची सरासरी किरकोळ घसरणीसह ११.३१ % वर आली आहे.
युको बँकेचा तोटा वाढून १,०१६ कोटी रुपयांवर
युको बँकेच्या तोट्यात तिसऱ्या तिमाहीमध्ये वाढ झाली असून तोटा १,०१६.४३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. हा २०१७ च्या डिसेंबर तिमाहीमध्ये ४३७.०९ कोटी रुपये होता.
वाढलेला एनपीए आणि त्यासाठी करावी लागणारी तरतूद यामुळे तोट्यात वाढ नोंदवण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी समान तिमाहीमध्ये ऑपरेटिंग नफ्यातही ५८.५ टक्क्यांची घसरण झाली आहे. बँकेचे व्याजातून होणारे उत्पन्न देखील कमी होऊन ३,४४९.५५ कोटी रुपये झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.