आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CCTV: खरेदी केले 50 रुपयांचे सामान; गायब केले 34 हजार रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच दुकानात चोरी झाली. - Divya Marathi
याच दुकानात चोरी झाली.

मुंबई- डोंबिवली येथील एका दुकानात तीन लोक काही सामान खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यांनी 50 रुपयांचे सामान खरेदी केले. दुकानदार सामान देत असताना यापैकी एकाने गल्ल्यातुन 34 रुपये चोरले. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस चोराचा शोध घेत आहेत.

 

अशा रितीने घडली चोरी
- मानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार राजेश रघुनाथ पवार (24) यांचे पाळीव जनावरांचे खाद्यपदार्थ विकण्याचे दुकान आहे. 
- रविवार त्यांच्या दुकानात काही लोक खरेदीच्या बहाण्याने आले. काही वेळ दुकानदारासोबत बोलल्यानंतर त्यांनी 50 रुपयांचे साहित्य खरेदी केले. 
- पैसे घेऊन राजेश सामान घेण्यासाठी उठल्यावर त्यापैकी एकाने त्यांच्या गल्ल्यातुन पैसे चोरले. ते सामान घेऊन ते निघुन गेले. 

- राजेश यांना थोडी शंका आल्यावर त्यांनी गल्ल्यात पाहिले. तेव्हा त्यांना सारे पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आले. चोरीची माहिती समजल्यावर राजेश आरोपींच्या मागे पळाले पण ते फरार झाले होते.

- त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले. या फुटेजमध्ये त्यांना पुरावे मिळाले. कॅमेऱ्यात एक जण चोरी करताना दिसत आहे. 
- त्यानंतर राजेश यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी सीसीटीव्हीतील आरोपींचे फोटो वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांना पाठवले आहेत. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...