आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील या जुळ्या भावडांचे कधी असे एकत्र होते शरीर, आज असे जगताहेत आनंदी लाईफ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूर्णपणे फिट झाल्यानंतर प्रिन्स आणि लव यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. इन्सेटमध्ये  एकत्र शरीर जोडलेले भावंडे... - Divya Marathi
पूर्णपणे फिट झाल्यानंतर प्रिन्स आणि लव यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. इन्सेटमध्ये एकत्र शरीर जोडलेले भावंडे...

मुंबई- जन्मताच एकत्र शरीर असलेल्या मुंबईतील लव आणि प्रिन्स या जुळ्यांना गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सर्जरी करून वेगळे केले होते. 20 डॉक्टर्सच्या टीमने सलग 12 तास सर्जरी केल्यानंतर त्यांना वेगळे करण्यात यश आले होते. यानंतर त्यांना मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते. सोमवारी डॉक्टर्सच्या सल्ल्यानंतर दोघांना डिस्चार्ज केले गेले. हॉस्पिटलने सांगितले की, दोघे आता एकदम फिट आहेत. त्यामुळे त्यांना आता डिस्चार्ज केले जात आहे. 2016 मध्ये झाला होता लव आणि प्रिन्सचा जन्म...

 

- 2016 मध्ये वाडिया हॉस्पिटलमध्ये मुंबईतील घाटकोपर परिसरात राहणारी शीतल झालटे यांनी या जुळ्यांना जन्म दिला होता.
- दोन्ही मुले लव आणि प्रिन्स जन्मापासून कंबर आणि पोटांशी एक-दुस-यांशी जोडलेले होते. जन्मजात एकत्र असण्याने या मुलांची अनेक अंग सारखेच होते.
- सर्जरीनंतर दोन्ही मुलांना देखरेखीखाली ठेवलेले होते. 
- लव आणि प्रिन्सच्या आधी हॉस्पिटलमधील डॉक्टर्सने रिद्धी आणि सिद्धी नावाच्या दोन मुलींना सर्जरी करून वेगळे केले होते.

 

दीड वर्षे सुरू होता उपचार- 

 

- लव आणि प्रिन्स यांची आई जेव्हा प्रेग्नेंट होती ती 24 व्या वीकमध्ये हॉस्पिटलमध्ये तपासायला गेली होती तेव्हाच डॉक्टरांनी त्यांना जुळे असल्याचे सांगितले होते. हे ऐकून ती घाबरली.
- तेव्हा शीतलने अबॉर्शन करण्याचा विचार केला, मात्र डॉक्टरांनी समजून सांगितल्यानंतर तिने मुलांना जन्म देण्याचा निर्णय घेतला.
- 19 सप्टेंबर 2016 रोजी शीतलने मुलांना जन्म दिला, तेव्हापासून मुले हॉस्पिटलच्या देख-रेखीखाली होते.

 

दोन मुलांना एकच लिव्हर-

 

- एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार, कॉन्जाईंड मुलांत सर्वात मोठी समस्या असते दोघांचे सारखेच अंग असणे. अनेकदा दोन मुलांत एकच लिवर आणि दो किंवा तीन किडनी असतात.
- अशा वेळी सर्जरी दरम्यान खूप सतर्कता बाळगावी लागते. लव आणि प्रिन्सच्या बाबतीतही असेच काहीसे होते. 
- सर्जरी करणारे डॉक्टर पी. बेंद्रे यांनी म्हटले होते की, लव आणि प्रिन्स पेट आणि कंबरेपासून जोडलेले होते. त्यातच त्यांचे लिवर, इंटेंस्टाईन आणि यूरिनरी ब्लॅडर एकच होते. सर्जरी दरम्यान जरा जरी चूक झाली तर महागात पडू शकते. कारण लिवर एकच होते. जे आम्ही सर्जरी दरम्यान त्या लिवरला कापून दोन भाग केले होते. अशाच प्रकारे इतर शरीराच्या पार्ट्सला सुद्धा वेगळे केले गेले.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, लव आणि प्रिन्सचे काही निवडक फोटोज.....

बातम्या आणखी आहेत...