आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्याणमध्ये सात नक्षलवाद्यांना अटक;कोरेगाव भीमा हिंसाचाराशी संबंध असल्‍याचा संशय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतीक फोटो - Divya Marathi
सांकेतीक फोटो

मुंबई- महाराष्ट्र एटीएसने शुक्रवारी कल्याणमधून ७ संशयित नक्षलवाद्यांना अटक केली. सर्व तेलंगणातील असून त्यांना १६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंधित एक नक्षलवादी कल्याण स्टेशनवर येणार असल्याची टीप एटीएसला मिळाली होती.  

 

पाळत ठेवून त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली तेव्हा त्याचे आणखी काही सहकारी मुंबईत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एटीएसने संबंधित घरांवर छापे टाकण्यात आले.  त्यात घाटकोपर येथील रमाबाई अंबडेकर नगर आणि विक्रोळी परिसरातील कामराज नगर येथून सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. सर्व संशयित सीपीआय (माओवादी) या संघटनेचे काम करत असल्याचे उघड झाले आहे. एटीएसने पंचासमक्ष घातलेल्या छाप्यात बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंधित अनेक कागदपत्रे या घरांतून जप्त करण्यात आली. संशयित ३० ते ५२ वर्षे वयाचे असून  नलगोंडा, करीमनगर (तेलंगणा) येथील मूळ रहिवाशी आहेत.

 

कोरेगाव भीमा हिंसाचाराशी संबंध?
कोरेगाव भीमा दगडफेक प्रकरणाच्या निषेधार्थ मुंबईत २ आणि ३ जानेवारी रोजी हिंसाचार उसळला होता. यात हे संशयित सक्रिय असावेत, असा एटीएसला संशय आहे. त्या दृष्टीने या प्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...