आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदलापूर येथे चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार, स्कूलबस चालकाचा पालकावर हल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याने बस चालकाला जाब विचारण्यासाठी गेलेल्या पालकांवर पाच जणांनी मिळून जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये ही घटना घडली आहे.

 


बदलापुरात राहणाऱ्या दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर स्कूल बस चालकाने लैंगिक अत्याचार करत असल्याचा आरोप आहे. आरोपी बस चालकाला जाब विचारण्यासाठी बुधवारी संध्याकाळी चिमुरड्याचे पालक गेले. तेव्हा पाच जणांनी मिळून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मंगेश पाटील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर बदलापूर पूर्व पोलिस स्टेशनमध्ये बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...