आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव बॉम्बस्फोट: भाजपकडून सरकारी वकिलांवर दबाव, शकील अहमद यांचे वक्तव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना मदत करण्यासाठी भाजपकडून सरकारी वकिलांवर दबाव टाकला जात आहे. ही बाब सगळ्यांनाच माहीत आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते शकील अहमद यांनी केले आहे.

 

 

2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ले. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा ठाकूरसह 5 जणांवरील मोक्का आज मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने हटवला. या सर्वांवर आता बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याखाली खटला चालणार आहे. या पार्श्वभूमीवर शकील अहमद यांच्या विधानाने या प्रकरणाला नवा राजकीय रंग मिळण्याची चिन्हे आहेत.

भाजप सरकारच नव्हे तर एनआयएकडूनही वकिलांवर दबाव टाकला जात आहे. खटल्याचे काम संथगतीने चालावे म्हणून त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे, असा दावा एका वकिलाच्या विधानाचा संदर्भ देत शकील अहमद यांनी केला.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...