आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनि देत आहे महाराष्ट्र, गुजरातमधील या गावांमध्ये पाहरा, जाणून घ्या काय आहे श्रध्दा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- धार्मिक मान्यतेनुसार शनिदेव हे ज्योतिष विद्येचे न्यायाधीश मानले जातात. शनि हा मनुष्यास पाप आणि वाईट कर्माची फळे देतो. शनिदेव हा सूर्य आणि छायेचा पुत्र असल्याचे म्हटले जाते. काही जण शनि हा क्रुर ग्रह असल्याचे मानतात. पत्नीच्या शापामुळे शनि क्रुर झाल्याचे म्हटले जाते. शनिला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी त्याला तेल, काळ तीळ आणि काळे वस्त्र अर्पण केले जाते. असे म्हणतात की, शनिची अवकृपा झाल्यास व्यक्ती राजाचा रंक होतो. त्याचवेळी भारतातील दोन गावांवर शनिची विशेष कृपा असल्याचे सांगितले जाते. या गावांमध्ये आजही काही ठिकाणी घर आणि दुकानांना कुलूप लावले जात नाही.

 

 

शनि शिंगणापूर (महाराष्ट्र)- शनि शिंगणापूर हे महाराष्ट्रातील एक प्रसिध्द ठिकाण आहे. येथे शनिदेव मोकळ्या आकाशाखाली आहेत. येथे अनेक वेळा छत उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तो अपयशी ठरला. या गावात स्वत: शनिचा वास असल्याचे म्हटले जाते.

 

 

सताडा (गुजरात)- शनि शिंगणापूरप्रमाणेच गुजरातमधील एक गाव सताडातही अशाच समजुती आढळतात. गुजरातमधील राजकोट जवळील सताडा गावात शनिदेवाचे प्राचीन मंदिर आहे. येथे शनिची भैरव दादा नावाने पूजा करण्यात येते. येथे चोरी झाल्यास शनिदेवच त्याच्यासोबत न्याय करतो, असे म्हटले जाते.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...