Home »Maharashtra »Mumbai» Shiv Chhatrapati Sports Awards Declared

अाैरंगाबादची साक्षी सर्वात युवा पुरस्कार विजेती; शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घाेषणा

दिव्य मराठी वेब टीम | Feb 13, 2018, 04:22 AM IST

अाैरंगाबाद-राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची साेमवारी घाेषणा करण्यात अाली. गत तीन वर्षांच्या या पुरस्कारासाठी १९५ जणांची निवड झाली अाहे. यामध्ये अाैरंगाबादची गुणवंत बुद्धिबळपटू साक्षी चितलांगे ही राज्य शासनाचा हा पुरस्कार पटकावणारी राज्यातील पहिली सर्वात युवा खेळाडू ठरली. १७ वर्षीय साक्षीने वयाच्या १५ व्या वर्षी २०१४-१५ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार पटकावला. रमेश तावडे, डाॅ. अरुण दातार, बिभीषण पाटील यांना जीवनगाैरव पुरस्कार जाहीर झाला. तसेच टीम इंडियाचा सलामीवीर राेहित शर्मासह अजिंक्य रहाणे, अाैरंगाबादच्या अंकित बावणेला हा पुरस्कार जाहीर झाला. याशिवाय अाॅलिम्पियन अॅथलेटिक्स ललिता बाबर, टेनिसपटू प्रार्थना ठाेंबरे,राेव्हर दत्तू भाेकनळचीही या पुरस्कारासाठी निवड झाली अाहे. शिवछत्रपती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांचे एकूण १९५ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

नामांकित खेळाडूंना पुरस्कार जाहीर
- क्रिकेट : राेहित शर्मा,
अजिंक्य रहाणे, अंकित बावणे
- अॅथलेटिक्स : ललिता बाबर
- टेनिस : प्रार्थना ठाेंबरे
- राेइंग : दत्तू भाेकनळ
- बुद्धिबळ : विदित गुजराती
- हाॅकी : युवराज वाल्मीकी,
देविंदर वाल्मीकी
- कबड्डी : नितीन मदने,
अभिलाषा म्हात्रे, किशाेरी शिंदे
- वेटलिफ्टिंग : अाेंकार अाेतारी, गणेश माळी
- एव्हरेस्टवीर : अाशिष माने
- जलतरण : साैरभ सांगवेकर
- बॅडमिंटन : अक्षय देवलकर
- मार्गदर्शक : प्रवीण अामरे
- खाडी व समुद्र पाेहणे : राेहन माेरे
- दिव्यांग खेळाडू : सुयश जाधव
जीवनगाैरवचे मानकरी
- रमेश तावडे
(अॅथलेटिक्स,२०१४-१५)
- डाॅ. अरुण दातार
(मल्लखांब, २०१५-१६)
- बिभीषण पाटील
(शरीरसाैष्ठव, २०१६-१७)
संघटक व कार्यकर्ते
२०१४-१५ : सुर्यकांत ठाकुर (मुंबई विभाग), सुनील जाधव (पुणे विभाग), बाबासाहेब समलेवाले (काेल्हापूर), राेहिदास पवार (अमरावती), फारुख शेख अब्दुल्ला (नाशिक), एकनाथ सांळुके (अाैरंगाबाद), अशाेक माेतीराज पाटील (नागपूर)
२०१५-१६ : विलास वाघ (मुंबई), श्रीकांत ढेपे (पुणे), संभाजी वरुटे (काेल्हापूर), प्रमाेद चांदुरकर (अमरावती), अविनाश खैरनार (नाशिक), डाॅ. माधव देसाई शेजुळ (अाैरंगाबाद, परभणी)
२०१६-१७ : देवेंद्र चाैगुले (मुंबई), शत्रुघ्न बिरकड (अमरावती, अकाेला), डाॅ. प्रदीप तळवेलकर (नाशिक, जळगाव), संजय माेरे (अाैरंगाबाद), राजकुमार साेमवंशी (लातुर, उस्मानाबाद)
यांचाही खास गाैरव
- ऑलिम्पिक खेळाडू कविताचे काेच विजेंद्र सिंग यांनाही उत्कृष्ट मार्गदर्शक
- नाशिकचे सायकलिस्ट महाजन बंधू यांना साहसी क्रीडा प्रकार
- सेव्हन अाेशन पोहणारा जलतरणपटू रोहन मोरे राज्य पुरस्काराचा मानकरी
असे अाहेत पुरस्काराचे मानकरी
2014-15 : दिनेश चितलांगे (बुद्धिबळ), साक्षी चितलांगे (बुद्धिबळ), स्वप्नील तांगडे (तलवारबाजी), मृगल पेरे (जिम्नॅस्ट), एकनाथ साळुंके.
2015- 16 : राहुल तांदळे (जिम्नॅस्ट), मयुर बोढारे (जिम्नॅस्ट), रोहन श्रीरामवार (जिम्नॅस्ट), सुरज ताकसांडे (जिम्नॅस्ट), राहुल श्रीरामवार (जिम्नॅस्ट), आदित्य तळेगावकर (जिम्नॅस्ट), इशा महाजन (जिम्नॅस्ट), अंकित बावणे (क्रिकेट).
2016-17 : सागर मगरे (तलवारबाजी), संजय मोरे (शरीरसौष्ठव), मनीषा वाघमारे (गिर्यारोहक).

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

Next Article

Recommended