आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेना लढवणार; संजय राऊत यांनी केली घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-  गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेना लढवणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेनेने फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे. त्यादृष्टीने आता  शिवसेनेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

 

 

गोवा लोकसभेच्या दोन्ही जागा लढवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. उद्धव ठाकरे पुढच्या महिन्यात गोव्यात येऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहितीही संजय राऊतांनी दिली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढेलच, पण यापुढे सर्वच राज्यात शिवसेना उमेदवार देईल. आम्ही निवडणूक जिंकू किंवा हरु, किती मते पडतील माहिती नाही, पण आम्ही लढू असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

 


हिंदू मतांमध्ये फाटाफूट होऊ नये म्हणून आतापर्यंत इतर राज्यात निवडणुका लढवल्या नाहीत, पण यापुढे प्रत्येक राज्यात शिवसेना निवडणूक लढवणार, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले होते. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...