आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे बॅंकेत ठेवले तर नीरव मोदीची भीती अन् घरात ठेवले तर नरेंद्र मोदींची- संजय राऊत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. - Divya Marathi
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

मुंबई- सोशल मिडियात नीरव मोदी प्रकरणावरून जे जोक व्हायरल होत आहेत त्याचाच आधार घेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. बॅंकेत पैसे ठेवले तर नीरव मोदीची भीती आणि घरात ठेवले तरी नरेंद्र मोदींची भीती, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी टि्वटवरवर व्यक्त केली आहे. पंजाब नॅशनल बॅंकेला नीरव मोदीने 11 हजार 400 कोटींना चुना लावल्यानंतर संजय राऊत यांनी नीरवसोबतच पंतप्रधानांना लक्ष्य केले आहे. 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी एका रात्रीत 500 व हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद होत असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे एकच खळबळ माजली होती. या नोटबंदीने देशाचा कोणताही फायदा झाला नसल्याचे निष्कर्ष काढले गेले आहेत. याचसोबत सर्वसामान्यांचा पैसा नरेंद्र मोदींनी बॅंका व इतर वित्तीय संस्थांमध्ये भरण्यास भाग पाडले असा आरोप केला जातो. आता सर्वसामान्य लोकांनी बॅंकेत ठेवलेला पैसा नीरव मोदी घेऊन विदेशात पळून गेला आहे. त्यामुळे सोशल मिडियात नीरव मोदी व पंतप्रधान नरेंद्र मोदींवरून जोक व्हायरल होत आहेत. आता या जोकचा वापर राजकीय पक्ष व त्यांचे नेतेही करू लागले आहेत हे संजय राऊत यांच्या टि्वटवरून समोर आले आहे. 

 

देशातील बॅंकिंग इंडस्ट्रीतील देशातील आणखी एक सर्वात मोठा घोटाळा नीरव मोदीने केला आहे. पंजाब नॅशनल बॅंकेला 11 हजार 400 कोटींना चुना लावून मोदी विदेशात फरार झाला आहे. भारतातील अत्यंत श्रीमंत व्यक्तीपैकी एक असून, त्याचा हिरे निर्यातीमध्ये जगभर दबदबा आहे. जगभरातील अनेक सेलिब्रिटींना रत्ने, आभूषणे पुरवणारा बडा व्यापारी म्हणून प्रसिद्ध आहे. फोर्ब्सने 2016 मध्ये जाहीर केलेल्या श्रीमंत तरुण व्यक्तींच्या यादीत नीरव मोदीचे नाव होते.  नीरव मोदीच्या कंपन्यां व संपत्तीचे मूल्य एकून मूल्य (नेटवर्थ) 1.74 अब्ज डॉलर इतके प्रचंड आहे. फायर स्टार डायमंड कंपनीची संपत्ती 2.3 अब्ज डॉलर इतकी आहे. नीरव मोदीचा व्यवसाय मुंबई, दिल्ली, लंडन, न्यूयॉर्क, लास व्हेगास, हवाई, सिंगापूर, बीजिंग, मकाव आदी ठिकाणांहून चालतो. मात्र, आता तो 11 हजार 400 कोटींचा घोटाळा करून विदेशात पळून गेला आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, संजय राऊत यांनी काय काय केले आहे टि्वट.....

बातम्या आणखी आहेत...