आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्पीय अधिवेशन: आक्रमक राहण्याचे उद्धव ठाकरेंचे शिवसेना आमदारांना आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अर्थसंकल्पीय अधिवेशनात आक्रमक व्हा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व मंत्री आणि आमदारांना दिले आहेत. मुंबईतील ‘ट्रायडंट’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना आमदार आणि मंत्र्यांची बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले.    

 


नाणार प्रकल्प, सातवा वेतन आयोग, शेतकऱ्यांची कर्जमाफी या विषयांवर सरकारला धारेवर धरण्याच्या सूचनाही उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिल्या आहेत. तसेच, लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावाची यादी जाहीर करण्याची मागणी करण्यासही सांगितले. 'मेक इन इंडिया' आणि 'मॅग्नेटिक महाराष्ट्र'मध्ये करण्यात आलेल्या घोषणांचा पाठपुरावा करण्याच्या सूचनाही उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत.

 


एकंदरीत अर्थसंकल्प मंजूर होण्यासाठी सरकारचा कस लागणार असल्याचे दिसते आहे. शिवसेनेच्या विरोधामुळे अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी मतदान होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, संसदीय गटनेते खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदारांची उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली. बैठक किंवा अधिवेशनाला खासदार उपस्थित राहत नसल्याने अडसूळ यांनी नाराजी व्यक्त केली.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

 
बातम्या आणखी आहेत...