आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीरप्पनच्या या बोलण्याने इम्प्रेस झाली होती ही तरूणी, यूनिक होती दोघांची लव्हस्टोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदन तस्कर वीरप्पन... - Divya Marathi
चंदन तस्कर वीरप्पन...

मुंबई- कुख्यात चंदनतस्कर वीरप्पनवर 184 केस दाखल झाल्यानंतर त्याच्यापर्यंत पोहचण्यासाठी पोलिस आणि लष्कराला तब्बल तीस वर्षे लागली. 3 राज्यांचे पोलिस त्याच्या मागावर होते त्यासाठी 20 कोटी रूपये खर्च झाले होते पण तो सापडत नव्हता. हाच वीरप्पन वयाच्या 29 व्या वर्षी एका 16 वर्षाच्या तरूणीच्या प्रेमात पडला व पुढे तिच्यासोबत आयुष्य घालवले. या मुलीचे नाव होते मुत्तुलक्ष्मी जी एका आदिवासी समाजातील होती. वीरप्पननेच केले होते प्रपोज...

 

- वीरप्पनने मुत्तुलक्ष्मीला 1989 मध्ये पाहिले होते. त्यावेळी तो एक वाद सोडविण्यासाठी धर्मपुरी जिल्ह्यातून आपल्या नेरुपुर गावात चालला होता.
- वीरप्पनने मुत्तुलक्ष्मीला कावेरीतून पाणी भरून घेऊन येताना पाहिले. पहिल्याच नजरेत वीरप्पन तिच्या प्रेमात पडला. 
- काही काळानंतर एकदा वीरप्पनने मुत्तुलक्ष्मी भेट घेतली व माझे तुझ्यावर असल्याचे म्हणाला. सोबतच तो तिला म्हणाला की, मी आयुष्यात कधीही लग्न करणार नव्हतो. पण तूला पाहिले आणि मी माझा निर्णय बदलला.
- रिपोर्ट्सनुसार, वीरप्पनने तिच्यावर प्रेम व्यक्त करताना म्हटले होते की, "जर तू माझ्या प्रेमाचा व लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावला तर माझ्या आयुष्यात लग्नाचा मुहूर्तच मिळणार नाही.'
- यानंतर वीरप्पन आणि मुत्तुलक्ष्मीने 1990 मध्ये लग्नाचा निर्णय घेतला. 

 

दोन मुली आहेत वीरप्पनला-

 

- वीरप्पनसोबत लग्न केल्यानंतर मुत्तुलक्ष्मी तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळच्या बॉर्डरवर जंगलांतच राहू लागली.
- मुत्तुलक्ष्मी तामिळनाडूतील धर्मापुरी जिल्ह्यात एका गरीब चरवाहा परिवारातील होती.
- वीरप्पन आणि मुत्तुलक्ष्मीला दोन मुली आहेत. ज्यांची नावे विद्यारानी आणि प्रभा आहेत. सध्या त्या दोघीही इंजिनियरिंगचे शिक्षण घेत आहेत.
- मुत्तुलक्ष्मी सध्या तामिळनाडूतील सेलममध्ये आपल्या कम्युनिटीसाठी सामाजिक कार्य करत आहेत.
- सोबतच ती अशा लोकांसाठी काम करत आहे ज्यांनी वीरप्पनला मदत केल्याच्या कारणाने पोलिस त्रास देत आहेत.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, वीरप्पन व त्याच्याशी संबंधित माहिती व फोटोज.....

बातम्या आणखी आहेत...