आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनिया गांधी नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात, लुटला सायकल चालवण्याचा आनंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनिया गांधीं यांचा व्हायरल होत असलेला फोटो. - Divya Marathi
सोनिया गांधीं यांचा व्हायरल होत असलेला फोटो.

मुंबई/पणजी- काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या नववर्षासाठी  गोव्यात दाखल झाल्या आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्या दिल्लीत परतणार आहेत. दरम्यान, त्यांनी गोव्यात सायकल चालविण्याचा आनंद लुटला.

 

 

पक्ष कार्यक्रमापासून दूर 
सोनिया गांधी या दक्षिण गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरल्या आहेत. आपल्या सुट्टी दरम्यान त्या याच हॉटेलमध्ये थांबणार आहेत.काँग्रेस अध्यक्ष पदाची कमान राहुल गांधी यांच्याकडे सोपविल्यानंतर त्या प्रथमच गोव्यात सुट्टीवर आल्या आहेत. काँग्रेस पक्ष कार्यक्रम आणि काँग्रेस नेते यांच्यापासून त्यांनी दूर राहणे पसंत केले आहे.

 

 

हॉटेल परिसरात सायकलिंग
सोनिया गांधी यांनी येथील हॉटेल परिसरात सायकलिंगचा आनंद लुटला. त्यांच्यासोबत खासगी सुरक्षा रक्षक आहेत. दरम्यान, पोलिस आणि हॉटेल प्रशासनाने त्यांच्याबात अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. दरम्यान, त्यांच्यासोबत काहींनी सेल्फी काढला. सोनिया गांधी यांनी यावेळी कोणाला निराश केले नाही. त्यांना सेल्फी घेऊ दिला.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...