आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

95 व्या वाढदिवसाला अभिनेते दिलीपकुमार यांच्यासाठी खास बिर्याणी, आइस्क्रीम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलीवूडला चित्रपटांचा सुवर्णकाळ देणारे महान अभिनेते दिलीपकुमार यांचा आज साेमवारी ९५वा वाढदिवस आहे. ते सध्या न्यूमोनिया या आजाराने ग्रस्त असले तरी वाढदिवस चाहत्यांसाठी नेहमीच पर्वणी ठरला आहे. मात्र, त्यांच्या पत्नी सायराबानो या नेहमीप्रमाणेच पती दिलीपकुमार यांचा हा वाढदिवस आणखीच खास बनवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. दिलीपकुमार यांना बिर्याणी आणि वॅनिला आइस्क्रीम प्रचंड आवडते. याच पार्श्वभूमीवर सायराबानो त्यांच्यासाठी हे पदार्थ स्वत:च्या हाताने बनवणार आहेत.

 

 त्या म्हणाल्या, दिलीपकुमार यांची प्रकृती सध्या बरी नसल्यामुळे यंदा आम्ही वाढदिवसाची पार्टी आयोजित केलेली नाही. त्यांना बिर्याणी व वॅनिला आइस्क्रीम खूप आवडते. आजारपणामुळे त्यांना ते जास्त खाऊ घालता येणार नाही आणि तशी जोखीम घ्यायची माझी इच्छाही नाही. परंतु त्यांच्या आवडीचे मी बनवलेले पदार्थ त्यांना दोन घास तरी खाऊ दिले जावे, अशी विनंती मी डॉक्टरांना केली आहे. डॉक्टरांनी होकार दिला आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. दिलीप साहेबांचे लाखो चाहते आहेत. दरवर्षी त्यांच्याकडून साहेबांसाठी खूप भेटवस्तू, पुष्पगुच्छ येत असतात. त्या चाहत्यांनी साहेबांच्या चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना करावी, अशी माझी विनंती आहे.  

 

भेटवस्तू आवडत नाहीत, शर्ट-पँट घेणार  
बानो म्हणाल्या, दिलीप साहेबांना साधे कपडे घालायला आवडते. कॉटनचे शर्ट आणि पँटवर त्याच रंगाचे मोजे आणि बूट हा त्यांचा आवडता पेहराव आहे. त्यांनी जगभरातून अशा प्रकारच्या पेहरावाचा मोठा संग्रह केलेला आहे. कोणत्याही खास समारंभासाठी महागड्या वस्तू घ्यायला त्यांना कधीच आवडत नाही. दरवर्षी मी त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांना भेट देत असते. मात्र, यंदा त्यांची प्रकृती बरी नसल्याने मी माझ्या आवडीचीच शर्ट आणि ट्राऊझरची नवी जोडी विकत घेऊन भेट देणार आहे.

बातम्या आणखी आहेत...