आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांनी सांगितले तुम्ही कॅन्सरच्या अंतिम टप्प्यात आहात, तरीही हारली नाही हिम्मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रूबी अहलूवालिया या मुंबईत मध्य रेल्वेत आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. - Divya Marathi
रूबी अहलूवालिया या मुंबईत मध्य रेल्वेत आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.

मुंबई- जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी रोजी असून यानिमित्ताने आम्ही तुम्हाला एका अधिकारी महिलेविषयी देणार आहोत. या अधिकारी महिलेने कॅन्सरवर मात करत जगासमोर एक उदाहरण ठेवले आहे. रुबी अहलूवालिया असे कॅन्सरवर मात करणाऱ्या या महिलेचे नाव आहे. त्या मुंबईत मध्य रेल्वेत आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. कॅन्सरवर मात केल्यावर त्यांनी ‘संजीवनी -लाइफ बियॉन्ड कॅन्सर’ नावाची एक बिगसरकारी संस्था सुरु केली आहे. त्यांनी आतापर्यंत एक लाखाहून अधिक कॅन्सर पेशंटला मदत केली आहे.

 

 

रूबी यांच्यावर 72 लघू चित्रपट
- रूबी कॅन्सरमुक्त झाल्यावर त्यांच्यावर आतापर्यंत 72 लघू चित्रपट बनले आहेत. या चित्रपटांमधून कॅन्सर पेशेंटला मोटिव्हेट करण्यात येते. देशातील 8 मोठ्या शहरातील 9 सरकारी रुग्णालयांमध्ये ‘संजीवनी’ आपली सेवा देत आहे. रुबीने आपले काही अनुभवही शेअर केले आहेत. 

 

 

अशा रितीने झाले लोकसेवा आयोगाकडून सिलेक्शन
- 54 वर्षीय रूबी सांगतात की, माझा जन्म 29 एप्रिल 1963 मध्ये डेहराडून येथे झाला. त्यांचे वडील प्रकाशचंद अहलूवालिया हे पोलिस अधिकारी होते. त्यांची बराच काळ लखनौ येथे नियुक्ती होती.
- माझे बालपण खूपच चांगले गेले. वडील सरकारी सेवेत असल्याने कोणत्याही आर्थिक चणचणीस सामोरे जावे लागले नाही. लखनौमधील कारमेल कॉलेजमधून 12 वीची परीक्षा दिली. लखनौ विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम. ए. केले. त्यानंतर गोविंद वल्लभ पंत सामाजिक शास्त्र संस्थेतून पीएचडी केली. 

- 1986 मध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि माझी निवड झाली. मला मध्य रेल्वेत चीफ अकाउंटटची पोस्ट मिळाली. 

 

 

पुढील स्लाईडवर वाचा रुबी यांनी कॅन्सरवर कशी केली मात आणि कॅन्सरग्रस्तांसाठी करत आहेत काय काम...

बातम्या आणखी आहेत...