आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका दुर्मिळ आजाराने गमावला 7 वर्षाचा मुलगा, आता ही लेडी अशी वाचवतेय इतरांचे प्राण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
20 फेब्रुवारी 2015 रोजी शीतल भाटकर यांनी आपल्या 7 वर्षाच्या मुलाला 'स्टोरेज डिसऑर्डर' आजारामुळे गमावले होते. - Divya Marathi
20 फेब्रुवारी 2015 रोजी शीतल भाटकर यांनी आपल्या 7 वर्षाच्या मुलाला 'स्टोरेज डिसऑर्डर' आजारामुळे गमावले होते.

मुंबई- मुंबईतील शीतल भाटकर या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या गरीब मुलांसाठी एक एनजीओ चालवतात. त्यांची संस्था 'विद आर्या' गंभीर आजाराने पीडित गरीब मुलांची हितचिंतक बनत औषधे आणि भोजनाची व्यवस्था करते. वर्ष 2015 मध्ये शीतल आणि तिचा पती विक्रांतने आपला सात वर्षाचा मुलगा आर्या याला 'स्टोरेज डिसऑर्डर' नावाच्या एका घातक आजाराने गमावले होते.

 

मुलाला वाचविण्यासाठी शीतल आणि विक्रांतने खूप पैसा घालवला पण मुलगा वाचू शकला नाही. शीतलने आमच्याशी बातचीत करताना आपले पर्सनल एक्सपीरियंस शेयर केले आणि आपल्या एनजीओबाबत माहिती दिली.

 

मुलगा गमाविल्यानंतर केला हा संकल्प-

 

शीतल सांगतात की, मुलाच्या गंभीर आजारादरम्यान मी खूप कठिण काळातून गेले. मला त्यावेळी लक्षात आले की, माझ्या मुलासारखी समाजात हजारो मुले आहेत जी गंभीर आजाराने त्रस्त आहेत त्यांचा मृत्यूही होतो. मात्र, घरातील लोकांना माहितच नसते की आपल्या मुलाला काय झाले आहे ते? गरीब लोकांना पोट भरणे अवघड असते तिथे मुलांवर उपचार कसे करणार.

 

शीतल भाटकर सांगतात की, माझ्या मुलाच्या मृतानंतर मी संपले होते. 20 फेब्रुवारी, 2015 रोजी माझा मुलगा जग सोडून गेला. मुलाच्या मृत्यूनंतर आता जीवन जगून काय करायचे असे मला वाटायचे. पण नंतर विक्रांतने मला आधार दिला. सोबतच मला त्या गरीब मुलांची आठवण झाली जे अशा वेगवेगळ्या आजारांना तोंड देत होते व त्यांना खाण्याची भ्रांत होती. नंतर मी पतीसोबत एक संस्था 'विद आर्या' बनविली. ज्याचे कार्य आहे अशा गंभीर आजाराने त्रस्त गरीब घरातील मुलांना मदत करणे. आता आम्ही त्यासाठी आयुष्य समर्पित केले आहे."

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जाणून घ्या कशी सुरूवात झाली 'विद आर्या'ची....

बातम्या आणखी आहेत...