आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरुळच्या शहाजीराजे स्मारकाच्या कामाला गती द्या : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अाैरंगाबाद जिल्ह्यातील शहाजीराजे यांच्या स्मारकाच्या कामाला गती देण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील कामांच्या अनुषंगाने सुधारित आराखडा तयार करावा. तसेच स्मारकाचे उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतरच्या देखभाल व दुरुस्तीसाठी हस्तांतरणाबाबत योग्य प्रस्ताव तत्काळ पाठवावा, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिले अाहेत.  


वेरूळ (ता. खुलताबाद) येथे शहाजीराजे स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाच्या उर्वरित कामाच्या तसेच हस्तांतरणाबाबत चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. या स्मारकाचे काम २००५ मध्ये सुरू करण्यात आले. पहिल्या टप्प्यात ३२ लाख रुपयांचे काम पूर्ण करण्यात आले, मार्च २००६ मध्ये दुसऱ्या टप्प्यांतर्गत चबुतरा बांधकाम, पुतळा बसवणे, पाणीपुरवठा, बाग बगिचा, विद्युतीकरण आदी कामे ५४ लाख रुपये ११ हजार रुपये खर्च करून करण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात मार्च २००८ मध्ये स्मारक परिसरात मराठ्यांचा इतिहास दर्शवणारी संग्रहालयाची इमारत, संभाजी राजे संग्रहालय, संत तुकाराम सांस्कृतिक सभागृह ही कामे करण्यात आली, अशी माहिती बैठकीत महसूलमंत्री पाटील यांना देण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...