आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्राच्या पाण्यावर उतरले विमान; वर्षभरात सेवा देणार; गडकरींच्या उपस्थितीत यशस्वी चाचणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पाईसजेटकडून सांगण्यात आले की, ही दुसऱ्या टप्प्यातील चाचणी आहे. - Divya Marathi
स्पाईसजेटकडून सांगण्यात आले की, ही दुसऱ्या टप्प्यातील चाचणी आहे.

मुंबई- नागपूर आणि गुवाहाटी येथे चाचणी घेतल्यानंतर मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर  केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री अशाेक गजापती राजू, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शनिवारी ‘सीप्लेन’ची यशस्वी चाचणी घेण्यात अाली. सीप्लेनसाठी सुरक्षिततेच्यादृष्टीने अावश्यक ती नियमावली तयार करून वर्षभरात ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार अाहे. स्पाईस जेटने जपानच्या सेतुची हाेल्डिंग्ज कंपनीबराेबर सहकार्य करार केला अाहे. जपानच्या  या कंपनीने  तयार केलेल्या काेडियाक जातीच्या विमाानाचा सीप्लेनसाठी उपयाेग करण्यात  येणार अाहे. सीप्लेन सेवा देण्यासाठी स्पाईसजेट १०० विमाने खरेदी करणार अाहे. 


केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यावेळी बाेलताना म्हणाले की, हवाई वाहतुकीसाठी समुद्र वा जलाशय सारख्या पर्यायांचा विचार अद्याप करण्यात अाला नव्हता.  देशाला ७,५०० किलाेमीटरचा सागरी किनारा मिळाला असून नद्या, लहान तलाव, धरणे वा इतर जलाशय माेठ्या संख्येने अाहेत. या सर्व जलायशयांचे रुपांतर वाॅटर पाेर्टमध्ये करण्याचा निर्णय सरकारने घेतला अाहे.सीप्लेनसाठी केवळ ३०० मीटरची धावपट्टी अावश्यक असते. त्यामुळे जलायशयांमधून अशा प्रकारची विमानसेवा देण्यात अडचण येणार नाही. तरंगती जेट्टी कमी वेळेत बांधणे शक्य असल्यामुळे पायाभूत उभारणीचा खर्च पण कमी अाहे. मुंबईतल्या विमानतळांची क्षमता संपली असल्याने अशा परिस्थितीत सीप्लेन हा चांगला पर्याय ठरू शकताे. 

 

एम्फिबियस विमान म्हणजे काय? 
एकच वैमानिक असलेले हे ‘एम्फिबियस’ विमान धावपट्टीची गरज न लागता पाण्यावरून उड्डाण करू शकते तसेच पाण्यावर उतरू शकते. त्यामुळे वाहतुकीचा अन्य पर्याय उपलब्ध नसल्यास या सीप्लेनच्या माध्यमातून कमी वेळेत पाेहचता येऊ शकते.

 

‘सीप्लेन’ची वैशिष्ट्ये

- राॅकट, लवचिक अाणि लहान पंख असल्याने मर्यांदीत जागेत उड्डाणाची करण्याची क्षमता 
- जमीन, पाणी, कमी अंतराच्या अाणि असुधारीत धावपट्यांवर उतरण्यास  सक्षम 
- पर्यटनाबराेबरच, एअर अॅम्ब्युलन्स, अाणीबाणीची सेवा देण्यास उपयाेगी 

 

 

स्पाईसजेटने काय म्हटलंय?
या विमानात 10 ते 14 जण प्रवास करु शकतात. सी प्लेनमुळे प्रादेशिक कनेक्टीव्हिटी वाढण्यास मदत होईल. शिवाय आपत्कालीन परिस्थितीतही या विमानाचा वापर करता येईल. पर्यटन विकासालाही याचा फायदा होईल, असं स्पाईसजेटने म्हटले आहे.

 

 > ३०० किलाेमीटर ताशी वेग

> ०४ काेटी रुपये - सीप्लेनची किंमत

> १०-१४  प्रवासी अासन क्षमता 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...