आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी अधिकाऱ्यांनी चाेविस तास माेबाइल सुरू ठेवावेत- एसटी महामंडळ महाव्यवस्थापक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बस प्रवाशांच्या अडचणी दूर करण्यासाठी व अडचणीच्या काळात तातडीने संपर्कात राहण्यासाठी एस.टी.चे विभाग नियंत्रक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी २४ तास अापले माेबाइल सुरू ठेवावेत. अापत्कालीन परिस्थितीत एखाद्या अधिकाऱ्याचा माेबाइल बंद असल्याचे अाढळल्यास त्यांना देण्यात येणारा माेबाइल भत्ता बंद करण्यात येईल, असा इशारा एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी ३२ जिल्ह्यांच्या विभाग नियंत्रकांना एका पत्रकाद्वारे दिला अाहे. 

 
महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देअाेल म्हणाले, प्रवाशांच्या तक्रारी दूर करण्यासाठी, त्यांच्या सूचना एेकून त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी एसटी महामंडळाने काॅल सेंटरची स्थापना केली. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काॅल सेंटर व प्रवाशांच्या संपर्कात राहणे अावश्यक अाहे.’  


महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘एसटी महामंडळ दरमहा अधिकाऱ्यांना माेबाइल भत्ता देते. मात्र काही अधिकारी नेमके कामाच्या वेळी माेबाइल बंद ठेवत असल्याचे निदर्शनास अाले अाहे. 

बातम्या आणखी आहेत...