आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य सरकार धनगरांना आरक्षण देण्यात अपयशी, अॅड. प्रकाश अांबेडकर यांचा अाराेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - संविधानाने धनगर जातीचा समावेश अनुसूचित जमातीत केला असतानाही सरकार धनगरांना अारक्षण देण्यात अपयशी ठरले असल्याचा अाराेप भारिप बहुजन महासंघाचे पक्षाध्यक्ष अॅड. प्रकाश अांबेडकर यांनी केला.  


ते म्हणाले, सत्ता येऊन साडेतीन वर्षे झाली तरी या समाजाचे काेणतेच प्रश्न सुटलेले नाहीत. अारक्षणाच्या मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष करून धनगर की धनगड असा वाद निर्माण करून त्यांच्यात फूट पडण्याचा प्रयत्न केला जात अाहे. परिणामी धनगर समाज अारक्षणापासून वंचित राहत अाहे. त्यामुळे या विराेधात सत्ता परिवर्तन घडवून अाणण्याची गरज अाहे. 

 

भाजप सत्तेत अाल्यानंतर धनगरांना अादिवासी दर्जा देण्याचे अाश्वासन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी पुण्याच्या सभेत दिले हाेते. पण, सत्तेत येऊन साडेतीन वर्षे उलटली तरी अारक्षणाचा प्रश्न कायम अाहे. लाेकसभा निवडणुकीला सव्वा वर्ष उरले असल्यामुळे सरकार याबाबत निर्णय घेईल, अशी स्थिती नाही. अंमलबजावणीचा दिलेला शब्द न पाळून धनगर समाजाचा भावनिक छळ सुरू अाहे. त्यामुळे सरकारला धडा शिकवण्याची वेळ अाता अाली आहे, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.


काँग्रेसची मग्रुरी अाड अाली  : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस इतकी वाईट कामगिरी करेल, असे वाटले नव्हते. वास्तविक पाहता काँग्रेसने जागांसाठी मैत्री गटांसोबत समझाेता करायला हवा हाेता. पण काँग्रेसची मग्रुरी या राष्ट्रीय पक्षाच्या  अाड अाली. भाजपचा विजय झालेला असला तरी एकाच पक्षाला इतक्या जागा मिळणे ही संशय घेण्यासारखी बाब आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.  त्यामुळे ईव्हीएम मशीनएेवजी मतपत्रिकेचा वापर करणे अतिशय गरजेचे अाहे. राज्यातील आगामी पोटनिवडणुकीत मतपत्रिकेचा वापर करण्याची विनंती अापण निवडणूक अायाेगाकडे करणार असल्याचे प्रकाश अांबेडकरांनी स्पष्ट केले.

 

२० मे रोजी पंढरपुरात सत्तापरिवर्तन मेळावा  
सरकारच्या विराेधात अारपारची लढाई लढण्याचा निर्णय धनगर समाजाने घेतला अाहे. त्यानुसार २० मे राेजी पंढरपुरात सत्तापरिवर्तन मेळावा अायाेजित करण्यात अाला अाहे. या मेळाव्यात धनगर समाज एकत्र येऊन स्वत:ची ताकद दाखवेल, असेही अांबेडकर म्हणाले. 

 

बातम्या आणखी आहेत...