आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य सरकारी कर्मचा-यांना खूषखबर: महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीने \'अच्छे दिन\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्य सरकारमधील कर्मचा-यांना 4 टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 1 जुलै 2017 पासून ही वाढ देण्यात असून, यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर सुमारे 100 कोटी रूपयांचा बोजा पडणार आहे. राज्य सरकारमध्ये कार्यरत असलेल्या 19 लाख लोकांना आणि निवृत्त अधिकरी- कर्मचारी यांना याचा लाभ होईल. उद्या किंवा परवा होणा-या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याची घोषणा केली जाईल.

 

राज्य सरकार केंद्र सरकारच्या नियमावलीप्रमाणे वर्षातून दोनदा म्हणजे 1 जानेवारी आणि 1 जुलै या तारखांना महागाई निर्देशांकानुसार भत्यामध्ये घट किंवा वाढ करते. सध्या राज्य सरकारमधील कर्मचा-यांना 136 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. आता 4 टक्के वाढीमुळे तो 140 टक्क्यांवर जाईल. याबाबतचा निर्णय मुख्य सचिवांनी घेतला असून, त्यास अर्थमंत्र्यांनीही ग्रीन सिग्निल दाखविला आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषद मंगळवारपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक बुधवारी होण्याची शक्यता आहे. त्यात मुख्यमंत्री व कॅबिनेट हा वर्षी लावतील असे बोलले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...