आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनील छेत्रीची मेसीशी बराेबरी; भारतीय संघ ठरला चॅम्पियन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कर्णधार सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली  भारतीय फुटबाॅल संघाने इंटरकाँटिनेंटल चषक पटकावला. यजमान भारतीय संघाने  घरच्या मैदानावर रविवारी फायनलमध्ये  केनियाचा पराभव केला. भारताने २-०  ने एकतर्फी विजयाची नाेंद केली. सुनील छेत्रीने (८, २९ वा मि.) गाेलचा डबल धमाका उडवून भारताला विजय मिळवून दिला. यासह भारताचा संघ या चषकाचा मानकरी ठरला.  पाहुण्या केनियाला शेवटच्या मिनिटांपर्यंत सामन्यात गाेल करता अाला नाही. पराभवामुळे केनियाचा संघ उपविजेता ठरला. विजयात दाेन गाेलचे याेगदान देणाऱ्या सुनील छेत्रीला सामनावीर पुरस्काराने गाैरवण्यात अाले. हा अंतिम सामना पाहण्यासाठी माेठ्या संख्येत चाहत्यांची उपस्थिती हाेती.  


अखिल भारतीय फुटबाॅल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल अाणि शिवसेनेचे अादित्य ठाकरे यांच्या हस्ते विजेत्या यजमान भारतीय संघाचा ट्राॅफी देऊन गाैरव करण्यात अाला. यादरम्यान महासंघाचे पदाधिकारीही माेठ्या संख्येत उपस्थित हाेते.  

 

छेत्रीचे वर्चस्व 
भारतीय संघाकडून कर्णधार सुुनील छेत्रीने मैदानावर अापला दबदबा कायम ठेवला. त्याने अाठव्या मिनिटाला भारताकडून गाेलचे खाते उघडले. त्यानंतर त्याने मध्यंतरापूर्वीच भारताच्या अाघाडीला मजबूत केले. त्याने २९ व्या मिनिटाला दुसरा गाेल केला. यासह भारताने पहिल्या हाफमध्ये विजय निश्चित केला. 

 

छेत्रीचे स्पर्धेत ८ गाेल

यजमान भारताच्या कर्णधार सुनील छेत्रीची अापल्या घरच्या मैदानावरील  कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्याने स्पर्धेत  चार सामन्यांत एकूण ८ गाेल केले. यासह ताे स्पर्धेत सर्वाधिक गाेल करणारा खेळाडू ठरला. त्याने सलामीला चीन-तैपेईविरुद्ध गाेलची हॅट््ट्रिक नाेंदवली हाेती. 

 

६४ गाेल; मेसीशी साधली बराेबरी

कर्णधार सुनील छेत्रीने फायनलमध्ये दाेन गाेल केले. यासह त्याने फुटबाॅल विश्वातील दिग्गज खेळाडू लियाेेेनेल मेसीच्या कामगिरीशी बराेबरी साधली. छेत्रीचे अाता राष्ट्रीय संघाकडून ६४ गाेल झाले अाहेत.मेसीनेही अर्जेंटिनाकडून खेळताना ६ ४ गाेल केले अाहेत.

बातम्या आणखी आहेत...