आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैलगाडा शर्यतींवर तूर्त बंदी कायमच; हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींवर बंदीच्या मुंबई हायकोर्टाच्या निकालास स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने मंगळवारी नकार दिला. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत व तामिळनाडूतील जल्लीकट्टू शर्यत कायम ठेवण्याच्या राज्य सरकारांच्या कायद्यांवर अाता सर्वाेच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठात सुनावणी होणार आहे. 


सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या न्यायपीठाने सुनावणदरम्यान सांगितले की, घटनेच्या कलम २९(१) नुसार सांस्कृतिक अधिकारांअंतर्गत राज्य सरकारांना असे खेळ सुरू राहू देण्याचा कायदा करण्याचा अधिकार आहे की नाही, याचा निर्णय घटनापीठ देईल.  महाराष्ट्र व तामिळनाडू सरकारने प्राणी क्रौर्य विराेधी कायदा १९६० अंतर्गत विधेयक आणून बैलगाडा शर्यत आणि जल्लीकट्टूला परवानगी दिलेली होती. त्याला आव्हान देणारी याचिका प्राणी हक्क संघटना पेटाने सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. सहा अाठवड्यांनी त्यावर सुनावणी केली जाणार आहे. सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारकडून ज्येष्ठ विधिज्ञ शेखर नाफाडे यांनी बाजू मांडली. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...