आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडे घराण्याचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही- गोपीनाथ गडावर सुरेश धसांची भावना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- उस्मानाबाद- लातूर- बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी विजय मिळताच परळीतील पांगरी येथील गोपीनाथ गडावर येऊन लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आपला विजय त्यांना समर्पित केला. मुंडेसाहेबांनीच मला पहिल्यांदा आमदार केले होते व आता त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांच्यामुळेच मी पुन्हा आमदार झालो आहे. मुंडे घराण्याचे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही अशा शब्दांत सुरेश धस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

 

उस्मानाबाद- लातूर- बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विजयी होताच नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी उस्मानाबाद येथून थेट परळीतील गोपीनाथ गड गाठला. तेथे मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेताना त्यांना भावना अनावर झाल्या. त्यांनी स्वतःच 'गोपीनाथ मुंडे साहेब अमर रहे'च्या घोषणा दिल्या. 

 

यावेळी बोलताना धस म्हणाले की, ''मुंडे साहेबांमुळेच मी पहिल्यांदा आमदार झालो आणि आता त्यांच्या कन्या पंकजाताई मुंडे यांच्यामुळे आमदार झालो आहे. ज्यांच्यामुळे मी राजकारणात यशस्वी झालो त्यांच्या चरणी मी नतमस्तक झालो आहे. आता यापुढे आयुष्यभर पंकजाताईंची साथ सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

 

बातम्या आणखी आहेत...