आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतक-यांनो पिकांची काळजी घ्या, आज व उद्याही मराठवाडा, विदर्भात गारपिटीची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मराठवाडा-विदर्भातील बहुतांश भागात पुढील दोन दिवस (13 फेब्रुवारीपर्यंत) गडगडाटासह वादळी वारे व गारपिटीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला अाहे. शेतकऱ्यांनी पिकांची कापणी करून साठवणूक करावी, असे आवाहन सरकारने केले आहे.

 

अंदाजानुसार, पुढील तीन दिवस गोंदिया, वर्धा, भंडारा, नागपूर, नांदेड, लातूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहू शकते. पूर्व विदर्भात गारपिटीची शक्यता अधिक आहे. 11 व 12 तारखेला विदर्भ आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांत वादळी वारे वाहण्याची व ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

 

कापणीवर आलेल्या ज्वारीसारख्या पिकांची कापणी करुन धान्य योग्यरित्या साठवावे. शेतमालाच्या व्यापाऱ्यांनी देखील शेतमालाची संरक्षितपणे साठवणूक करावी. सर्व नागरिकांनी वादळी वारे, विजा आणि गारपीटीपासून स्वत:सह गुराढोरांचे संरक्षण होईल, याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...