आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोजोसचा मालक युग तुलीचा अटकपूर्व जामीन मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कमला मिल अग्निकांडातील मोजोस बिस्ट्रोच्या मालकांपैकी एक असलेल्या युग तुलीचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. तुलीच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करणारा अर्ज या अागीत मृत्युमुखी पडलेल्या पारुल लकडावाला या महिलेच्या पतीने दाखल केला होता.   


कमला मिल अग्निकांडातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या युग तुलीच्या जामीन अर्जावर गुरुवारी सत्र न्यायालयात युक्तिवाद पार पडला. तुलीच्या वतीने युक्तिवाद करताना त्याच्या वकिलांनी २९ डिसेंबरला लागलेली आग ही शेजारच्या वन अबव्ह हॉटेलमध्ये लागली होती. त्यामुळे त्या दुर्घटनेसाठी मोजोस बिस्ट्रोच्या मालकांना जबाबदार धरता येणार नाही, असा दावा केला. मात्र, मुंबई अग्निशमन दलाचा अहवाल आणि प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांकडे दिलेल्या साक्षीनुसार आग सर्वात आधी मोजोस बिस्ट्रोमध्ये लागल्याचे स्पष्ट होत असल्याचा प्रतिवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला होता. दरम्यान, याच प्रकरणातील युग पाठक याच्या पोलिस कोठडीत १७ जानेवारीपर्यंत वाढ केली. मोजोसचा एक मालक युग तुली अजूनही फरार असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...