आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुक्क्यामुळे लागली आग; प्रत्यक्षदर्शी प्रतीक व सिद्धार्थने सांगितला थरारक अनुभव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- इतरांप्रमाणे प्रतीक ठाकूर त्याची पत्नी तसेच ८ ते १० जणांबराेबरच हाॅटेलमध्ये अाला हाेता. अचानक लागलेल्या अागीचे तांडव जवळून अनुभवणाऱ्या प्रतीकने ९० टक्के अाग हुक्क्यामुळे लागली असल्याची शंका व्यक्त केली.  या अागीतून प्रतीकची पत्नी अाणि सर्व मित्र सुखरूप बचावले अाहेत. हा चित्तथरारक अनुभव सांगताना प्रतीक म्हणाला की, १२.३० वाजता अाग लागली तेव्हा बरेच जण हुक्का सेवन करत हाेते. छताला करण्यात अालेल्या सजावटीला लागलेली अाग भडकून इतरत्र पसरत हाेती. त्यामुळे गाेंधळाचे वातावरण निर्माण झाले. बाहेर पडण्यासाठी अरुंद रस्ता हाेता तरी कसाबसा मी अाणि माझे मित्र जीव वाचवून खाली अालाे. पण, त्याच वेळी माझी पत्नी ताेरल अातमध्ये अडकली असल्याचे वाटून तिला साेडवण्यासाठी मी पुन्हा वर गेलाे. इतक्यात ताेरलचा भाऊ मयंक पारेख याने मला बघितले अाणि ताेरल सुखरूप खाली गेली अाहे. अापणही येथून लवकर बाहेर पडू, असे अाेरडून सांगितले. बाहेर पडण्यासाठी एकच गर्दी झाली हाेती. शेवटी १० ते १२ लाेकांच्या अंगावरून उड्या मारत अामची सुटका झाली. पण ताेरलचा दुसरा भाऊ लाेकेश अाणि एक डीजे वाॅशरूममध्ये अडकून पडले हाेते. बाहेर अागीचे लाेळ उठत असल्याने सुरक्षा रक्षक त्यांना बाहेर पडू देत नव्हता. परंतु दाेघांनी अारडाअाेरडा करून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यांना अागीच्या ज्वाळांमध्येही बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला. पण अाणखी २० मिनिटे जरी वाॅशरूममध्ये अडकून राहिले असते तर ते अागीच्या भक्ष्यस्थानी पडले असते, अशा भावना प्रतीकने व्यक्त केल्या.  


एकच दार असल्याने झाली चेंगराचेंगरी - सिद्धार्थ श्राॅफ
अाग छतावरून खाली येत भडकत चालली हाेती. काय हाेत अाहे काहीच कळत नव्हते. प्रत्येक जण बाहेर पडण्याचा मार्ग शाेधत हाेता. बाहेर पडण्यासाठी एकच दरवाजा असल्याने चेंगराचेंगरी सुरू झाली. त्यातच मीदेखील हाेताे. इतक्यात वरून अागीचा लाेळ माझ्या शर्टवर येऊन पडला. तशाच अवस्थेत जिवाच्या अाकांताने मी कसाबसा सुखरूप वरून खाली अालाे. मदतीसाठी जाेरजोरात हाका मारण्यास सुरुवात केली. सुदैवाने कमला मिलमधील एका व्यक्तीने मला त्याच्या कारमध्ये बसवूून तातडीने  रुग्णालयात दाखल केल्यामुळे मी बचावलाे, असे या आगीच्या तडाख्यात सापडलेल्या सिद्धार्थ श्राॅफ यांनी सांगितले. भाटिया रुग्णालयात दाखल असलेले श्राॅफ यांच्या दाेन्ही हातांना भाजले अाहे.

बातम्या आणखी आहेत...