आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रावरील गारपिटीचे संकट तूर्त टळले; हवामान खात्याचा इशारा मागे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्रावरील गारपिटीचे संकट तूर्त टळले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) उत्तर महाराष्ट्रात शुक्रवार, शनिवारी गारपिटीचा इशारा दिला होता, तो मागे घेण्यात आला आहे. हिमालय भागातील कमी दाबाचा पट्टा क्षीण झाल्याने महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता मावळल्याचे म्हटले आहे.   


आयएमडीने उत्तर महाराष्ट्रात शुक्रवार, शनिवारी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस होण्याची शक्यता असल्याचा इशारा तीन दिवसांपूर्वी दिला होता. मात्र आता उत्तर भारतातील पर्वतमय भागातील कमी दाबाचे क्षेत्र विरळ झाल्याने गारपिटीची शक्यता मावळली असल्याचे आयएमडीने स्पष्ट केले. महाराष्ट्रातील हवामानात बदल होत असून तेथील तापमान वाढत असल्याचे हवामान विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...