आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरंगत्या हॉटेलला परवानगी उच्च न्यायालयाने नाकारली;सुरक्षेच्या कारणाने परवानगी नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंटजवळील समुद्रात तरंगते हॉटेल आणि जेटी बांधण्यासाठीची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने नाकारली आहे. वाहतूक कोंडी आणि सागरी सुरक्षेच्या कारणास्तव ही परवानगी नाकारण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.  


मरीन ड्राइव्ह आणि आसपासचा परिसर हा हेरिटेज दर्जाचा असल्याने तसेच सागरी सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या उच्चाधिकार समिती तसेच मुंबई महापालिकेने अगोदरच या हॉटेलसाठीची परवानगी नाकारली होती. याशिवाय अशा हॉटेलमुळे या परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढून वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यताही लक्षात घेण्यात आली होती. समितीच्या त्या आदेशाला आव्हान देत रश्मी डेव्हलपर्स प्रा. लि. या कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आपल्याला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, नौदलाचे वेस्टर्न कमांड, मुंबई महानगर विकास प्राधिकरण, मुंबई पोलिस आणि तटरक्षक दल या सर्वांनी आपल्या तरंगत्या हॉटेलच्या प्रस्तावाला परवानगी दिल्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला होता. मात्र, न्या. अभय ओक आणि न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने उच्चाधिकार समिती आणि महापालिकेचा निर्णय उचलून धरत संबंधित कंपनीला दिलासा देण्यास नकार दिला.

बातम्या आणखी आहेत...