आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदरात वाढ होण्याची शक्यता: रिझर्व्ह बँक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक चार ते सहा जूनदरम्यान होणार आहे. यात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांवर तसेच महागाईवर  होणाऱ्या परिणामांवर विचार होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक पतधोरण  ठरवताना किरकोळ महागाईचा विचार करते. एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दर  तीन महिन्यांच्या उच्चांकावर ४.५८ टक्क्यांवर पोहोचले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या  दरात सलग १६ दिवसांपासून वाढ होत आहे.

 

अशा परिस्थितीत व्याजदरात कपात  होण्याची अपेक्षा तर अजिबात नाही, उलट महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदरात  वाढ होण्याची शक्यता असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ४ ते ५ एप्रिलदरम्यान  मागील बैठकीमध्ये समितीने महागाई वाढण्याची शक्यता वर्तवत रेपो दर ६ टक्क्यांवर  कायम ठेवला होता. समितीची बैठक ५ ते ६ जूनदरम्यान होणार होती. मात्र, नंतर ही बैठक ४ ते ६ जूनदरम्यान निश्चित करण्यात आली. 

 

बातम्या आणखी आहेत...