आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा 75 तालुक्यांत सत्यमेव जयते वॉटर कप; सात हजार गावांचा सहभाग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील जनतेकडून दोन वर्षे भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर अभिनेता अामिर खान याच्या पाणी फाउंडेशनने शुक्रवारी सह्याद्री अतिथिगृह येथे सत्यमेव जयते वॉटर कपचा तिसरा बिगुल फुंकला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान, प्रसिद्ध उद्योगपत मुकेश  अंबानी  आदी उपस्थित होते.  


यंदा सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे २०१८ असणार आहे. विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख रुपये, ५० लाख रुपये व ४० लाख रुपये रोख पारितोषिके दिले जातील. स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील आघाडीवर असलेल्या गावालाही दहा लाख रुपये रोख पारितोषिक आहे. विजेत्या गावांना मिळणारी पारितोषिकांची रक्कम १० कोटींपर्यंत गेली आहे.  स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक गावातील पाच प्रशिक्षणार्थींना फाउंडेशन पाणलोट विकासाच्या विज्ञानाचे प्रशिक्षण देते. त्यानंतरच गावकरी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भाग घेतात. ४५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत गावकरी श्रमदानाने तसेच मशीनच्या साहाय्याने जलसंधारणाच्या रचना उभारून पाणी साठवण क्षमता निर्माण करतात. गेल्या वर्षी झालेल्या दुसऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत ३० तालुक्यांतील १ हजार ३२१ गावांनी भाग घेतला होता. 

बातम्या आणखी आहेत...