आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासू-सासऱ्यांच्या शुश्रूषेसाठी महिलांना विभागाबाहेर बदली; मंत्रिमंडळाची मंजुरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गंभीर अाजारी असलेल्या सासू- सासऱ्यांच्या शुश्रूषेसाठी शासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांना अाता महसूल विभाग बदलून मिळू शकेल. असा अर्ज करण्यास त्यांना परवानगी देण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात अाला. त्यासाठी महसुली विभाग वाटप नियम - २०१५ मध्ये सुधारणा करण्यात येणार अाहे. यासोबतच गट अ व  ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदांवर सरळ सेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी आपापसात महसुली विभाग बदलून देण्याची विनंती केल्यास बदली करण्याच्या प्रस्तावासही मान्यता देण्यात आली. आधीच्या नियमांत सुधारणा करून महिला अधिकाऱ्यांनाा सासू-सासऱ्यांसाठी विभाग बदलून  मिळेल.