आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर, मला इच्छा मरण द्या! एयर इंडियाने नोकरी नाकारल्याने ट्रान्सजेंडरची राष्ट्रपतींकडे याचना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शानवी पोन्नुस्वामी सध्या मुंबईत राहत आहे. - Divya Marathi
शानवी पोन्नुस्वामी सध्या मुंबईत राहत आहे.

मुंबई- एयर इंडियात नोकरी न दिली गेल्याने मुंबईत राहत असलेली ट्रान्सजेंडर शानवी पोन्नुस्वामीने राष्ट्रपतींकडे दया मरण (इच्छा मृत्यू) देण्याची मागणी केली आहे. शानवीचा आरोप आहे की, ट्रान्सजेंडर असल्या कारणाने तिला एयर इंडियात नोकरी दिली गेली नाही. नोकरी नाकारताच तिने राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना पत्र लिहून इच्छा मृत्यू देण्याची विनंती केली आहे. शानवीने एयर इंडियात केबिन क्रूसाठी अर्ज केला होता. काय आहे शानवीचे म्हणणे...

 

- शानवीने भेदभाव होत असल्याचा आरोप करत म्हटले आहे की, 'मी इतर कोणत्याही एयरलाईनमध्ये अप्लाय केले नाही. जेव्हा सरकारी एयरलाईनमध्ये आमच्यासाठी (ट्रान्सजेंडर) कोणतेही कॅटेगिरी नाही, तेथे खासगी प्रायवेट एयरलाईन्सकडून कशी अपेक्षा धरायची? आता मी जगणार की मरणार हे राष्ट्रपतींच्या हातात आहे.'
- शानवीने पुढे म्हटले आहे की, ' आपल्या देशात ट्रान्सजेंडरसाठी कोणतेही कॅटेगिरी नाही. काय मला माझ्या टॅक्समध्ये डिस्काउंट मिळतो. मला पण इतरांसारखाच टॅक्स भरावा लागतो ना. माझ्याजवळ अनुभव आणि पात्रता आहे. मग काय फक्त माझ्या जेंडरचा विषय आहे काय?"


शानावीने लढली मोठी कायदेशीर लढाई-

 

- शानवीने तामिळनाडूत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत मॉडेलिंग सुरू केले. ती सध्या मुंबईत राहते. 
- मॉडेलिंगच्या काळात तिने निर्णय घेतला होता की, एयर इंडियात ज्वाईन व्हायचे. मात्र, तिच्या स्वप्नाच्या मध्ये तिचे ट्रान्सजेंडर असणे अडथळा ठरला.
- जेव्हा तिने एअर इंडियात एयर होस्टेस आणि केबिन क्रूसाठी अर्ज केला होता. मात्र, अर्ज केवळ एवढ्यासाठी फेटाळून लावला की एयर इंडियात पुरूष आणि महिला सोडून इतर कोणताही पर्याय नाही.
- या प्रकरानंतर शानवीने हार मानली नाही तिने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. ज्यानंतर सुप्रीम कोर्टाने एविएशन मिनिस्ट्रीकडे चार आठवड्याच्या आत याचे उत्तर मागितले.
- सुप्रीम कोर्टाने मंत्रालयाला फटकारत विचारले की, थर्ड जेंडरचा ऑप्शन काय नाही ठेवला गेला?
- राष्ट्रपतींना लिहलेल्या पत्रात शानवीने दावा केला आहे की, याबाबत ना एयर इंडियाने उत्तर दिले ना नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने सुप्रीम कोर्टाला उत्तर दिले. 
- शानवीने राष्ट्रपतींना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, नोकरी करण्याशिवाय माझा उदरनिर्वाह कसा होणार. त्यामुळे मला दया मरण (इच्छा मृत्यू)ची परवानगी द्यावी.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, देशातील बड्या यंत्रणांना आव्हान देणा-या शानवीचे फोटोज.....

बातम्या आणखी आहेत...