आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवजयंतीचा उत्साह: शिवनेरी किल्ल्यावर रंगला जन्मोत्सव सोहळा, फडणवीस यांची हजेरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. - Divya Marathi
शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज राज्यभऱ उत्साहात साजरी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडावर जाऊन महाराजांना अभिवादन केले. त्यावेळी उपस्थित हजारो महिला व समुदायासह त्यांनी पाळणा हलवला. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे आदी उपस्थित होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मुंबईत विमानतळावर छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. 

 

दिल्लीत खासदार संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य शिवजयंतीचा जंगी कार्यक्रम आयोजित केला आहे. दिल्लीतील कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत. यासाठी दोन हजार कलाकार राजधानीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्र सदनात शिवजन्मोत्सव सोहळा व शाहिरी कार्यक्रम होईल. यानंतर राजपथावरून भव्य मिरवणूक निघणार आहे. यात हत्ती घोडे आणि ऊंटही पाहायला मिळतील. मागील महिन्यात पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये याच चमूने सहभाग घेत देशात पहिला क्रमांक पटकावला होता.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, आजच्या शिवजयंतीचे फोटोज....

बातम्या आणखी आहेत...