आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपद्वारे बुक केली कार, समुद्राच्या मधोमध दिसून आले ड्रायव्हरचे लोकेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उबेरने कारचे लोकेशन अरबी समुद्रात दाखवले आहे. (लाल वर्तुळात) - Divya Marathi
उबेरने कारचे लोकेशन अरबी समुद्रात दाखवले आहे. (लाल वर्तुळात)

मुंबई-  सध्या एक फेसबुक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुंबईच्या हुसैन शेख नावाच्या यूजरने ऑनलाईन उबर कॅब बुक केली. त्यानंतर त्याला उबरकडून कॅब ड्रायव्हर असलमच्या लोकेशनचा मेसेज आला. त्यात असलम यांचे लोकेशन चक्क अरबी समुद्रात दाखवण्यात आले होते.

 

 

हुसैन शेखने सोशल मीडियावर पोस्ट केली शेअर

हुसैन शेखने याचा स्क्रिन शॉट काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हुसैने याची फेसबुकवर खिल्ली उडवताना म्हटलेय की, “असलम भाई सबमरीनमधून येत आहेत.” हुसैनची ही फेसबुक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, फेसबुक यूजर्सकडून त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. तसेच हा स्क्रिनशॉट मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...