आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोनवर गुफ्तगू नाही, पण चंद्राबाबूंना शुभेच्छा, उद्धव ठाकरेंनी चर्चेचे वृत्त फेटाळलं

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्याशी फोनवरून कोणतीही चर्चा झाली नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 'सामना' या मुख्यपत्रातून उद्धव यांनी याबाबतची भूमिका मांडली आहे. मोदी सरकार व भाजपच्या भूमिकेमुळे चंद्राबाबू नायडू सध्या नाराज आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोन करून चर्चा केल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले होते. 

 

उद्धव ठाकरे यांनी माध्यमांवर आगपाखड करताना म्हटले की, चंद्राबाबू नायडू व आमच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली असे बोलले जात आहे. असे बोलल्याचे आम्ही राष्ट्राच्या चौथ्या स्तंभात वाचले आहे. भिंतीलाही कान असतात हे आम्ही ऐकून होतो, पण आता दूरध्वनीलाही कान लागलेत की काय अशी शंका येऊ लागली आहे. नायडू हे आमच्याशी खरेच बोलले काय व नेमके काय बोलले यावर आता तर्कवितर्क लढवून चौथा स्तंभ ‘सब से तेज’ पत्रकारितेचे दर्शन घडवीत आहे. एनडीएतील इतर काही नेत्यांनी ‘मातोश्री’चा फोन फिरवलाय हे लवकरच आम्हाला वृत्तपत्रांतून कळेल अशी आशा आम्ही बाळगत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, उद्धव ठाकरे यांनी 'सामना'त काय काय म्हटले आहे...

बातम्या आणखी आहेत...