आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील \'त्या\' मुलाखतीमुळे शरद पवार इतिहासजमा होण्याची शक्यता- उद्धव ठाकरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्रापासून मुंबई कुणालाच तोडता येणार नाही व विदर्भाचा लचकाही ‘केक’सारखा कापता येणार नाही, या शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेचीच उजळणी शरद पवार यांनी त्यांच्या मुलाखतीतून केली. उजळणीत बेरजेला महत्त्व आहे. शरद पवार आधी उत्तर काढतात व मग वरचे बेरीज-वजाबाकीचे आकडे भरतात. गेली काही वर्षे पवारांचे उत्तर चुकते आहे. त्यांच्या मुलाखतीतील ‘उत्तरे’ बरोबर असली तरी त्यांच्या बेरजा-वजाबाक्यांची उजळणी पुन्हा घ्यावी लागेल. ऐतिहासिक मुलाखतीने पवार इतिहासजमा तर होणार नाहीत ना? आम्हाला काळजी वाटते हो! अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली आहे. 

 

शरद पवारांची बुधवारी पुण्यात एक विस्तृत मुलाखत झाली. यात पवारांनी विविध विषयांवर चौफेर भाष्य केले. मात्र, शिवसेनेने पवारांच्या पूर्वीच्या व आताच्या बदललेल्या भूमिकांवर बोट ठेऊन त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 

 

उद्धव ठाकरेंनी 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यनगरीत नुकतीच एक ऐतिहासिक की काय अशी मुलाखत दिली. त्यात त्यांनी एक ऐतिहासिक भूमिका मांडली. पवार यांनी सांगितले की, ‘‘मला जातीपातीचे राजकारण मान्य नाही.’’ पवार यांनी पुण्याच्या भूमीवरून फुले-आंबेडकर-शाहूंच्या महाराष्ट्राला असाही संदेश दिला की, ‘‘जातीपातीवर आधारित आरक्षण नीती मोडून काढली पाहिजे.’’ पवार यांचे म्हणणे असे की, ‘आज विविध समाजघटकांकडून आरक्षणासाठी आंदोलने होत असली तरी जातीच्या निकषावर नव्हे तर आर्थिक निकषावरच आरक्षण द्यायला हवे!’ पवार यांनी मांडलेली भूमिका ही फक्त टाळ्य़ा मिळविण्यासाठीच असावी. पण या भूमिकेवर त्यांना टाळ्य़ा मिळण्याची शक्यता नाही. टाळी देण्यासाठी जो दुसरा हात लागतो तो त्यांच्या आसपासही दिसत नाही. कारण स्वतः शरद पवार हे देशातले ज्येष्ठ नेते असले तरी राजकारणातील त्यांच्या भूमिकांना कधीच स्थैर्य मिळाले नाही व जातीच्या राजकारणास पाठबळ देणा-या भूमिका ते घेत राहिले आहेत, असे उद्धव ठाकरेंनी अग्रलेखात म्हटले आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे वाचा, उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर कोणत्या शब्दात केला आहे हल्लाबोल....

बातम्या आणखी आहेत...