आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेबांना अटक केली तेव्हा कळवळा कुठे गेला होता - उद्धव ठाकरेंचा सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘राजकारणात बाळासाहेब ठाकरेंनी जे केले ते उघडपणे. त्यांनी कधी कुणाच्या पाठीत वार केला नाही. बाळासाहेबांविषयी अापल्याला अापुलकी असल्याचे सांगणाऱ्यांचा वयाच्या ७० व्या वर्षी शिवसेनाप्रमुखांना अटक हाेत असताना त्यांच्याविषयीचा कळवळा कुठे गेला हाेता?,’ असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शरद पवारांना उद्देशून केला. पक्षाच्या प्रतोद अामदार नीलम गोऱ्हे यांच्या ‘माझी शिवसेनेतील २० वर्षे’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमानंतर ते बाेलत हाेते.  


माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी बुधवारी पुणे येथे राज ठाकरे यांना दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेबांबद्दल आपुलकी व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना उद्धव म्हणाले, ‘१९९२- ९३ मधील अग्रलेखावरून बाळासाहेबांना अटक करण्याचे प्रयत्न २००० मध्ये करण्यात आले. पण ती रोखण्यासाठी कोणीही प्रयत्न केले नाही. मग तेव्हा बाळासाहेबांबद्दलची आपुलकी कुठे होती? असा प्रश्न विचारतानाच ‘कालची मुलाखत मी चाेरूनही पाहिलेली नाही,’ असेही उद्धव यांनी स्पष्ट केले. ‘अार्थिक अारक्षणाच्या बाबतीत शिवसेनाप्रमुखांनी घेतलेली भूमिका त्याच वेळी स्वीकारली असती तर आज समाजात जातीपातीच्या भिंती उभ्या राहिल्या नसत्या. मराठी माणूस आज एकत्र असता’, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले. शरद पवारांच्या विदर्भाबाबतच्या भूमिकेवर उद्धव म्हणाले, ‘शरद पवार ‘सामना’ वाचत असावेत. आम्ही देखील हेच म्हटले आहे. विदर्भातील मराठी माणसाला स्वतंत्र राज्य नको आहे.’ 

 

बुडालेले पैसे  सरकारने द्यावेत
नीरव मोदींच्या घाेटाळ्याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘या प्रकरणानंतर देशातील जनतेत बँकांबद्दल संशयाचे वातावरण आहे. बँक बुडवली जात असून यामुळे लोकांनी कष्टाने जमा केलेले पैसेही बुडतात. आता सरकारने बँकेतील पैशांचीही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. यासंदर्भात सेनेचे खासदार पंतप्रधान व अर्थमंत्र्यांची भेट घेतील.’

 

नागपूर: मराठी भाषिक मुख्यमंत्री अपयशी म्हणून विदर्भ राज्य हवे : श्रीहरी अणे

‘विदर्भाच्या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेले भाष्य अतिशय खोडसाळ आणि पद्धतशीर गैरसमज पसरवणारे अाहे. विदर्भाची मागणी कुठेही भाषावादावर आधारित नाही. एकही मराठी भाषिक मुख्यमंत्री विदर्भाचा विकास करू शकलेला नाही म्हणून आम्हाला विदर्भाचे राज्य हवे आहे,’ अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी महाधिवक्ता आणि विदर्भाच्या आंदोलनाचे नेते अॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केली.  पुण्यातील मुलाखतीत पवार यांनी ‘विदर्भाची मागणी ही केवळ पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमधील हिंदी भाषकांची अाहे,’ असा दावा केला हाेता. हिंदी आणि मराठी भाषिकांच्या वर्चस्वाच्या वादातून विदर्भ राज्याची मागणी पुढे येत असल्याचे पवार म्हणाले. त्यावर अणे म्हणाले, ‘विदर्भाबाबत हिंदी आणि मराठी भाषिकांचा वाद खोडसाळ आणि पद्धतशीर गैरसमज पसरवणारा अाहे.’

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, नीलम गो-हे यांच्या पुस्तक प्रकाशनाचे फोटोज....

बातम्या आणखी आहेत...