आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवींचे जीवन अशी कविता जिच्या शेवटच्या ओळीच लिहिल्या गेल्या नाहीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काही वर्षांपूर्वी श्रीदेवींचे सासरे सुरेंद्र कपूर यांचा ७५ वा वाढदिवस चेन्नईत साजरा झाला. रात्री प्रीतीभोज देण्यात आला. या वेळी रजनीकांत व कमल हसन यजमानासारखे वावरत होते. प्रत्येक पाहुण्याची अगदी आदबीने विचारपूस करत होते. एवढेच नव्हे, पाहुण्यांसाठी ट्रेमध्ये ड्रिंक आणून देत होते. या दोन सुपरस्टारचे हे वागणेच श्रीदेवींबद्दल त्यांच्या मनात किती स्नेह होता हे सिद्ध करणारे होते. चेन्नईस्थित या बंगल्याच्या छतावर एक काचेची भिंत आणि काचेचेच छत असलेली खोली आहे. येथून आकाशातील चमकणारे तारे पाहता येतात. पावसात न भिजताही तुषारांचा आनंद घेता येतो. याच प्रकारे चांदण्यांचा प्रकाश श्रीदेवींच्या आत्म्यासाठी तप्त ठरली, पावसाच्या फवाऱ्यांनी त्यांच्या मादक शरीरावर ओरखाडे ओढले. श्रीदेवींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत बालिशपणा होता. मादक आणि निरागसतेचा हा अनोखा संगमच त्यांच्या लाेकप्रियतेचे रहस्य ठरला. 


काही वर्षांपूर्वी त्यांना एका कार्यक्रमात नृत्य सादर करावयाचे होते. त्यांनी आपल्या पथकाला घरी बोलावले आणि १५ दिवस तासन््तास सराव करत राहिल्या. त्यांना विचारण्यात आले की, चित्रपटात तुम्ही हे नृत्य सादर केलेले आहे. शूटिंगच्या वेळी तुम्ही खूप रिहर्सल केल्या असतील, मग तुम्हाला रंगीत तालमीची काय गरज आहे? श्रीदेवी उत्तरल्या, रियाज ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते. प्रत्येक वेळी वाटते की आणखी चांगले करता येऊ शकले असते. ही जिद्द व मेहनत श्रीदेवीला इतर तारकांपेक्षा वेगळी ओळख मिळवून देते. मिस्टर इंडिया प्रदर्शित झाल्यानंतर श्रीदेवीच्या आईची प्रकृती बिघडली होती. माहिती कळताच बोनी कपूर चेन्नईला आले. डॉक्टरांशी चर्चेनंतर आईला अमेरिकेला नेण्याचा सल्ला दिला. त्याची सर्व व्यवस्था करून ते स्वत: श्रीदेवी व त्यांच्या आईसोबत अमेरिकेला गेले. तेथील ऑपरेशनदरम्यान एका त्रुटीमुळे श्रीदेवींच्या आईचे निधन झाले. या दु:खाच्या वेळी त्यांनीच श्रीदेवीला सावरले. त्यांनी रुग्णालयावर खटला दाखल केला. कोर्टाबाहेर झालेल्या समझोत्यानंतर श्रीदेवीला मोठ्या रकमेची भरपाई मिळाली. 

 

बहुतेक या दिवसांत त्यांच्या प्रेमाला अंकुर फुटला. सहानुभूतीने सुरू झालेले नाते प्रेमात बदलले. बोनी कपूरने सलीम-जावेद लिखित मिस्टर इंडिया बनवण्याचा निश्चय केला. त्या काळी अनिल कपूर फार मोठे स्टार नव्हते. त्यांच्या नावावर चित्रपटाचा खर्च वसूल होईल अशी परिस्थिती नव्हती. शेवटी त्यांना वाटले की, एक टॉपची महिला स्टार सोबत असावी म्हणजेच चित्रपटाचे आर्थिक गणित जुळवता येईल. बोनी कपूर चेन्नईला गेले आणि श्रीदेवींना भेटण्याची विनंती केली.  तेव्हा श्रीदेवीच्या आई म्हणाल्या, तुम्हाला काही दिवसांनीच भेटीची वेळ मिळू शकते. तूर्तास वाट पाहा. बोनी कपूर यांनी हॉटेलमधून मुक्काम हलवला नाही. अाणखी २-३ दिवस आतुरतेने वाट पाहली. मात्र काहीच निरोप आला नाही. शेवटी त्यांनी रात्री श्रीदेवीच्या बंगल्याभोवती फेऱ्या मारल्या होत्या.  एके दिवशी मी बोनी कपूरला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. मला संध्याकाळपर्यंत विमानतळावर परतायचेही होते. सुदैवाने त्या दिवशी बोनी कपूर यांची कार बिघडलेली होती. मला श्रीदेवीच्या ड्रायव्हरसोबत पाठवण्यात आले. प्रत्येक सिग्नलवर कार थांबायची, अनेक तृतीयपंथी गोळा व्हायचे. त्यांच्या चर्चेतून कळले की, श्रीदेवी या लोकांना नेहमीच बक्कळ पैसे द्यायची. तिच्या मनात अशा दैवदुलर्क्षित लोकांबाबत कणव होती. आपण श्रीदेवींच्या आयुष्याकडे एक चित्रपट म्हणून पाहिले तर इंटरव्हलनंतरच्या रिळा गायब झाल्याचे म्हणता येईल. आपण श्रीदेवींच्या आयुष्याला एखाद्या कवितेसारखे पाहिले तर तिच्या शेवटच्या ओळी लिहिलेल्याच नाहीत, असे म्हणता येईल. आपल्या आयुष्यात अर्ध्या शतकापर्यंत त्यांनी कॅमेऱ्याशी मैत्री निभावली. चार वर्षे ते ५४ व्या वर्षांपर्यंत अभिनय करत राहिल्या. आता कॅमेरा त्यांची उणीव कसा सहन करेल?

- जयप्रकाश चौकसे

बातम्या आणखी आहेत...