आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Love story: सचिन- साराच्या प्रेमात फुले कमी काटेच जास्त पण त्यांनी जगाला दाखवून दिले...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट आणि सारा पायलट - Divya Marathi
माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट आणि सारा पायलट

जयपूर- सध्या व्हॅलेंटाईन वीक साजरा होत आहे. यानिमित्त आम्ही तुम्हाला माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांच्या लव्हस्टोरीबाबत सांगणार आहोत. जम्मूमधील अब्दुल्ला या राजकीय घराण्यातील कन्या सारा आणि राज्‍यस्‍थानमधील बडे राजकीय घराण्यातील सचिन पायलट यांची 'प्रेमकहानी' एकदम फिल्मी आहे. सारा या फारुक अब्दुल्लांच्या कन्या असून जम्मूचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाच्या भगिनी आहेत. सचिन हिंदू आणि सारा मुस्लिम. हे प्रेम व लग्न एक इंटरकास्ट, इंटररिलिजन व इंटरस्टेट होते. जुळणारा एकच समान धागा होता तो म्हणजे दोन्ही आपापल्या राज्यातील मोठी राजकीय घराणी. आम्ही माहिती देणार आहोत सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांच्या लव्हस्टोरीबाबत....

 

- प्रेमाच्‍या वाटेवर फुले कमी आणि काटे अधिक असतात. सचिन- साराच्या बाबतीतही तेच घडले.
- सचिन पायलट आणि त्यांची पत्नी सारा यांची पहिली भेट विदेशात शिक्षण घेत असताना झाली आणि तिथेच त्यांचे प्रेम बहरले. नंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. 
- मात्र हे जेवढे वाचायले सहज आणि सरळ होते तेवढा त्यांचा लग्नापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. 
- या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा एका नव्या संकटालाच निमंत्रण दिले. या दोघांनी आपापल्या कुटुंबियांना लग्नाबद्दल विचारणा केली तेव्हा कहर माजला होता. 
- सुरूवातीला विरोध केल्यानंतर पायलट कुटुंबिय लग्नाला तयार झाले पण अब्दुला कुटुंबियांचा कडवा विरोध होता.

 

इंटरकास्ट, इंटररिलिजन व इंटरस्टेटमुळे होती अडचण- 

 

- राजेश पायलट हे राजस्थानातील काँग्रेसचे बडे प्रस्थ राहिले. राजीव गांधींचे ते वर्गमित्र होते. पुढे ते राजकीय सहकारी झाले. 
- राजस्थानमधील पायलट घराणे बडे प्रस्थ तर होतंच पण जम्मू-कश्मीरमधील अब्दुला परिवारही तेवढेच तोलामोलाचे होते. 
- सारा जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची मुलगी. या घराण्यातील एक- दोन नाही तर तीन-तीन मुख्यमंत्री झालेले. 
- साराचे आजोबा अब्दुला अब्दुला, पिता फारूख अब्दुला आणि बंधू ओमर अब्दुला हे जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. 

 

खुद्द पिता व भावाचे इंटररिलिजन प्रेमविवाह तरी मुलीच्या लव्हमॅरेजला विरोध-

 

- अब्दुला कुटुंबियांनी लग्नाला कडवा विरोध केल्यानंतर साराने सचिनसोबतच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 
- सांगितले जाते की, साराला तिच्या आईचा व वहिनीचा आतून पाठिंबा होता त्यामुळे सारा बिनधास्त होती.
- साराचे पिता फारूख अब्दुला यांचेही लव्हमॅरेज आहे. विशेष म्हणजे फारूख यांनी कॅथेलिक ख्रिश्चन महिलेसोबत लग्न केले आहे तर बंधू ओमरने पंजाबी शीख तरूणीसोबत लग्न केले आहे. तरीही साराच्या प्रेमविवाहाला त्यांचा विरोध आश्चर्यचकित करणारा होता.
- अब्दुला कुटुंबात धर्माची कट्टरता असेही काही वातावरण नव्हते. मात्र, तरीही पिता व बंधूला सचिन पसंत नव्हते. पुढे मात्र, सर्व काही सुरळित झाले.

 

सचिन-साराच्‍या लग्‍नापासून अब्दुला कुटुंबिय राहिले दूर- 

 

- सचिन पायलट आणि सारा अब्दुल्‍ला लंडनमध्‍ये शिकत असताना दोघांमध्‍ये प्रेम झाले. दोघांनीही लग्‍नाचा विचार आपापल्‍या घरी सांगितला. 
- सचिनच्‍या घरचे तयार झाले. परंतू, अब्दुल्ला परिवार हे मानायला तयार नव्‍हते. सचिननेही धर्म, राजकारण, सामाजिक वातावरण सर्वांना छेद देत सारासोबत लग्‍न करण्‍याचे निश्चित केले. 
- साराही सचिनसोबत लग्न करण्यास ठाम होती. त्यामुळे अब्दुला कुटुंब आणखी भडकले.
- सचिन यांनी 15 जानेवारी 2004 रोजी सारासोबत विवाह केला. त्यावेळी साराच्या कुटुंबातील कोणीही हजर नव्हते. 
- पण खरं प्रेम असेल तर त्‍याला जात- पात, धर्म, पंथ, राज्य, देश कधीच आडवा येऊ शकत नाही. शेवटी प्रेमाचा विजय होतो. हेच सचिन पायलट आणि साराने दाखवून दिले.
- आज या जोडप्याला आरान आणि विहान अशी दोन मुले आहेत. सचिन पूर्णवेळ राजकारणात काम करतात तर साराने स्वत:ला सामाजिक कामात गुंतवून घेतले आहे.

 

खासदार बनल्‍यानंतर अब्दुल्लांनी सचिनला स्विकारले-

 

- सचिन यांनी 2004 साली वयाच्‍या 26 व्‍या वर्षी लोकसभा निवडणूकीत स्‍वत:ला अजमावले आणि लाखों मतांनी खासदार म्‍हणून निवडून आले. त्यावेळी भारतीय संसदेच्या इतिहासातील ते सर्वात तरूण खासदार ठरले.
- सचिन खासदार बनल्‍यानंतर अब्दुल्‍ला परिवाराचा विरोध मावळला व पुढे अब्दुल्‍लांनी सचिनला जावई म्‍हणून स्वीकारले. 

 

सर्वात तरूण खासदार ठरलेत सचिन-

 

- सचिन पायलट देशातील सर्वात पहिले तरुण (वयाच्या 26 व्या वर्षी) खासदार ठरले होते.
- आता राजस्थान काँग्रेसची कमान सचिन यांच्याकडेच आहे. या वर्षाअखेर होणा-या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा ते प्रमुख चेहरा असणार आहेत.
- नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीत पायलट यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसने दोन लोकसभेच्या व एक विधानसभेची जागा मोठ्या मताधिक्याने जिंकल्या आहेत.
- सचिन पायलट हे राहुल गांधींच्या जवळच्या पहिल्या पाच नेत्यांपैकी एक आहेत. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, सचिन आणि साराची निवडक छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...