आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BJP ने मला बोलण्याशिवाय काहीच काम केले नाही, माझ्यासोबत सावत्रपणा; शत्रुघ्न सिन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप खासदार शत्रुध्न सिन्हा यांनी आरोप केला आहे की त्यांना भाजपमध्ये सावत्रपणाची वागणूक मिळत आहे. - Divya Marathi
भाजप खासदार शत्रुध्न सिन्हा यांनी आरोप केला आहे की त्यांना भाजपमध्ये सावत्रपणाची वागणूक मिळत आहे.

मुंबई- नुकतेच यशवंत सिन्हा यांच्या बिगर राजकीय व्यासपिठाशी संलग्न झालेल्या भाजप खासदार शत्रुध्न सिन्हा यांनी म्हटले आहे की, त्यांना भाजपमध्ये सावत्रपणाची वागणूक मिळत आहे. सिन्हा म्हणाले की, मोकळ्या हवेत श्वास घेणारे ते स्वातंत्र्य जपणारे व्यक्ती आहेत. भाजपने मला बोलण्याशिवाय अन्य कोणतेही काम करु न दिल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

 

देशासाठी काम करत राहणार
- यशवंत सिन्हा यांनी अनेक वेळा मोदी सरकार टीका केली आहे. त्यांनी राष्ट्र मंच नावाने बिगर राजकीय संघटना उभारली आहे. त्यात शत्रुध्न सिन्हाही सामील झाले आहेत. शत्रुध्न यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अनेक बाबींचा खुलासा केला आहे. 

- सिन्हा म्हणाले की, मी सांगू शकत नाही की मला किती मुक्त वाटते. मुक्त वातावरणात श्वास घेण्याचा आनंद काही वेगळाच असतो. मी देशाच्या प्रगतीस कार्यरत राहणार आहे. आपले मत मुक्तपणे मांडणार आहे.

- भाजपमध्ये आपल्याला बोलण्यापासून रोखण्यात येते का, यावर ते म्हणाले की, त्यांनी मला याव्यतिरक्त दुसरे काहीच काम करु दिले नाही. मी भाजपमध्ये सावत्र मुलगा असल्याचा भावना घेऊन आहे.

 

 

खऱ्या अर्थाने बदल घडेल
- शत्रुघ्न म्हणाले की, राष्ट्रीय मंच कोणतीही निवडणूक लढविणार नाही. कारण तो काही राजकीय पक्ष नाही. समाजात बदल घडावा यासाठी आम्ही कार्यरत राहु. हा बदल केवळ शब्द नसतील तर तो प्रत्यक्षात दिसेल. 

- शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि गरिबांचे आर्थिक प्रश्न या विषयांवर आम्ही काम करु. याव्यतिरिक्त बेरोजगारी आणि देशांतर्गत आणि बाह्य सुरक्षा हे मुद्देही आम्ही अग्रक्रमाने घेऊ. 

 

 

मोदींनाही सुधारणा हव्यात
- वास्तविकतेच्या आधारावर तुम्हाला काम करु दिले जाईल का? या प्रश्नावर शत्रुध्न म्हणाले की, का नाही, अखेर आमच्या देशाचे अॅक्शन हिरो असणाऱ्या मोदींनाही सुधारणा हव्या आहेत.    

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...