आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यास रवाना होणार आहे. तत्पूर्वी बुधवारी विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. विराट कोहली याने नुकतेच अनुष्का शर्मासोबत विवाह केला आहे. दोघांचे रिसेप्शनही नुकतेच मुंबईत पार पडले. टीम इंडियातून ब्रेकबाबत विचारले असता कोहली म्हणाला की, काही महत्वपुर्ण कारणामुळे मी टीमपासून दुर होतो पण क्रिकेटमध्ये परतणे फारसे अवघड नाही. क्रिकेट माझ्या रक्तात आहे. कोहलीने लग्नानंतर श्रीलंकेविरोधात वन डे आणि टी 20 साठी ब्रेक घेतला होता.
- कोहली म्हणाला, हा काळ आम्हा दोघांसाठी स्पेशल होता. पण प्रोफेशनल जीवनात परतणे फारसे अवघड नाही. असे नाही की मागील तीन आठवड्याने मी काहीच केले नाही. मी ट्रेनिंग घेत होतो कारण मला दक्षिण आफ्रिकेत खेळायचे होते. डोक्यात एवढी एकच बाब होती की दौरा महत्वपुर्ण आहे.
- कोहली म्हणाला, आम्ही कुणापुढे काही सिध्द करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला चाललेलो नाही. आम्ही फक्त क्रिकेट आणि देशासाठी काही तरी करता यावे यासाठी चाललो आहोत.
या दक्षिण आफ्रिकेत काय करणार टीम इंडिया
- विराट कोहली म्हणाला, 2013 मध्ये आम्ही दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेले होतो. त्याबद्दल आम्ही खूपच एक्साइटेड होतो. तेथे आम्ही एक कसोटी सामना जिंकला होता. आमचे गोलंदाज खूपच अनुभवी होते. आता आम्ही तेथे ते करणार आहोत जे आम्ही यापूर्वी करु शकलो नाही.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.