आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी कर्मचाऱ्यांची सावकारी; गुन्हे दाखल करणार - रावते, राज्यभरातील अागारांना अादेश जारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या अार्थिक अडचणींचा गैरफायदा घेऊन अधिकृतपणे सावकारी करणाऱ्या ‘एसटी’च्या कर्मचाऱ्यांवर यापुढे कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे अादेश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी प्रशासनाला शनिवारी दिले.


त्यानुसार सुरक्षा आणि दक्षता विभागाने तातडीने परिपत्रक काढून राज्यभरातील अागारांना हे अादेश कळवले अाहेत. एसटी महामंडळात सुमारे १ लाख कर्मचारी आहेत. त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी एसटी कर्मचारी सहकारी बँक आहे. तसेच स्थानिक पातळीवर काही कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन सरकारी पतसंस्थांची स्थापली आहे. सरकारी, आणि सहकारी बँकांमधूनही  पतपुरवठा केला जाऊ शकतो. असे असताना काही कर्मचारी अडचणीच्या काळात सावकाराकडे जातात व त्यांची अार्थिक लूट हाेते, अशा तक्रारी अाल्या हाेत्या.
काही कर्मचारी भिशीच्या नावाखाली अवैध सावकारीचा धंदाही करत अाहेत. अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी मनोज लोहिया 
यांनी दिले अाहेत.

बातम्या आणखी आहेत...